उद्या होणार जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा

पुणे, दि. 23 : राष्ट्रीय ग्राहक दिनाचे उद्या 24 डिसेंबर रोजी (शुक्रवार) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आयोजन करण्यात आले आहे.

दरवर्षी २४ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने येत्या 24 डिसेंबर रोजी जिल्हा व तालुका स्तरावर विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयातील योजना व तक्रार निवारणाबाबत प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात यानिमित्ताने जनतेमध्ये वस्तू व सेवा खरेदी करताना दर्जा तसेच वजनमापांमध्ये होणाऱ्या फसवणुकीपासून सावधानता बाळगण्याबाबत संदेश, ग्राहक म्हणून प्राप्त असणाऱ्या हक्कांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी ग्राहकांनी तसेच ग्राहकांच्या जबाबदाऱ्या कर्तव्ये आदींबाबत ग्राहकांमध्ये जागरूकता येणे आवश्यक असल्याने त्याबाबतचे संदेश व माहिती देणारे विविध शासकीय कार्यालयांचे स्टॉल्स, लोककला व पथनाट्ये येथे आयोजित करण्यात आली आहेत. या प्रदर्शनाचा लाभ सर्व नागरीकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने यांनी केले आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )