अमोल भगत यांना आर्ट बिट्स महाराष्ट्र ” युवा कला गौरव ” राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान…

प्रतिनिधी (गणेश तावरे) चित्रपट कथा, दिग्दर्शन ” या विभागात हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला असून, आर्ट बिटस् फौंडेशन कडून हा पुरस्कार ऑनलाईन पध्दतीने प्रदान करण्यात येणार आहे. या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर झाला आहे. याबद्दल विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
या पुरस्काराची माहिती देतांना आर्ट बिटस् पुणे या संस्थेचे संस्थापक, संचालक संतोष पांचाळ म्हणाले की आर्ट बिटस् ही संस्था गेली वीस वर्षे सातत्याने चित्र, शिल्प, संगीत, अभिनय, नृत्य आणि लोककला या विभागातील कला आणि कलाकारांना सक्षम व्यासपीठ व प्रोत्साहन देण्यासाठी काम करीत आहे. या संस्थेच्या माध्यमातून कलाकारांसाठी अनेक उत्तम उपक्रम राबविले जातात.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )