चिली स्वीट कार्न सूप

चिली स्वीट कार्न सूप

भाग -६ आजच्या खाना खजाना या सदरामध्ये आपण पाहणार आहोत चिली स्वीट कार्न सूप

साहित्य – स्वीट कार्न, 2 वाळलेली लाल मिरची, 5 कप पाणी, स्टॉक पाणी, ½ छोटा चमचा साखर चवीनुसार मीठ, 1 मोठा चमचा मक्क्यांचे पीठ, अर्धे अंडे, 1 चमचा अजीनोमोटो, 1 छोटा चमचा तेल.

पद्धत – वाळलेल्या लाल मिरचीस थोडा वेळ पाण्यात भिजवावे देठ आणि बिया काढुन मग कापावे. अण्डयास वाटीत तोडुन फेटावे. मक्क्यांच्या पीठास 1½ कप पाण्यात घोळावे तेल गरम करावे. कापलेली लाल मिरची टाकावी थोडया वेळ शिजवून त्यात पाणी स्टॉक मिळवावे.

उकळु लागल्यावर स्वीटकार्न टाकावे आणि एकदा परत उकळावे जर काही मळ असेल तर काढुन टाकावे. साखर, अजिनोमोटो आणि मीठ टाकावे. पाण्यात घोळलेल्या मक्क्याच्या पिठास यात थोडे थोडे मिळवावे जेणेकरून सूप घट्ट होईल. गॅस कमी करावा फेटलेले अण्डे वर येईल तेव्हा हळुच चाळावे गरम गरम वाढावे.

माहिती संकलन – वैष्णवी क्षीरसागर
(महिला प्रतिनिधी)

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )