मळद येथे ऊस पाचट व्यवस्थापन प्रात्यक्षिक संपन्न..

मळद येथे ऊस पाचट व्यवस्थापन प्रात्यक्षिक संपन्न..

प्रतिनिधी – मळद येथे कृषि विभाग व दौंड शुगर प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने एकरी शंभर टन ऊस उत्पादन अभियान व ऊस पाचट व्यवस्थापन मोहीमेअंतर्गत ऊस पीक परिसंवाद आयोजित करण्यात आला होता.
सदरील कार्यक्रम मळद येथील प्रगतशील शेतकरी संतोष रणवरे यांच्या प्रक्षेत्रावर पाचट कुट्टीचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी दौंड शुगर चे शास्त्रज्ञ उमेश अवचर यांनी जमिनीचे आरोग्य व्यवस्थापनाविषयी सखोल मार्गदर्शन केले. यावेळी अंगद शिंदे यांनी पाचट व्यवस्थापन करण्याविषयी उपस्थित शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. सर्व शेतकऱ्यांना पाचट न जाळण्याची शपथ देण्यात आली. कृषि विभागाच्या वतीने उपस्थित शेतकऱ्यांना पाचट कुजविणारे जिवाणू कल्चर वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला दत्तात्रय शेलार संचालक खरेदी विक्री संघ दौंड, माजी सरपंच दत्तात्रय शेलार, अजित म्हेत्रे, मयूर रणवरे, सागर शेलार, हनुमंत दुधे, विशाल दुधे, भगवान दुधे, दत्तात्रय साळुंखे, समीर निंबाळकर, पोपट लांडगे, संदीप गायकवाड, दौंड शुगर कारखान्याचे ऊस विकास अधिकारी संदेश बेनके, मंडळ कृषि अधिकारी पाटस महेंद्र जगताप, कृषि पर्यवेक्षक संजय कदम, कृषि सहाय्यक शंकर कांबळे, प्रकाश लोणकर, अतुल होले, कैलास शेंडकर व मळद परिसरातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते उपस्थित्यांचे आभार मळद येथील कृषि सहाय्यक अझहरुद्दीन सय्यद यांनी मानले.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )