अखंडित बारामती ते शिर्डी पायी पालखी सोहळ्याचे यंदा 11 वे वर्ष….

अखंडित बारामती ते शिर्डी पायी पालखी सोहळ्याचे यंदा 11 वे वर्ष….

श्रद्धा व सबुरी काय असते हे बिरजू मांढरे यांच्याकडून शिकावे – किरण गुजर

बारामती : श्रद्धा आणि सबुरी या महान वचनाचे पालन करीत सामाजिक एकात्मता जोपासत साईच्छा सेवा ट्रस्टने केलेले कार्य कौतुकास्पद असून साई बाबाचे विचार आजही मार्गदर्शक असल्याचे असल्याचे प्रतिपादन बारामती हाय-टेक टेक्स्टाईल पार्क च्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी सांगितले. मा. उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे यांच्या संकल्पनेतून साईच्छा सेवा ट्रस्ट ने
बारामती ते शिर्डी पायी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते पालखीच्या प्रस्थान प्रसंगी सुनेत्रा पवार बोलत होत्या या प्रसंगी जेष्ठ नगरसेवक किरण गुजर, सुधीर पानसरे, अभिजीत जाधव, नवनाथ बल्लाळ, राजेंद्र बनकर व तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष संभाजी होळकर, शहर अध्यक्ष जय पाटील, विजय खरात, किशोर मासाळ, अजीज शेख, सुजित जाधव, भारती मुथा, दिनेश जगताप, के.टी जाधव, राहुल मोरे आदी मान्यवर व सर्व पत्रकार बंधू उपस्थित होते. दहा वर्ष पूर्ण करून 11 व्या वर्षात पदार्पण करताना बारामती बरोबरच इंदापूर, दौंड, फलटण व नगर जिल्यातील अनेक साईभक्त सहभागी होत असतात शिर्डी मध्ये गुजरात, आंध्र प्रदेश,व महाराष्ट्रातून अनेक साई पालख्या येतात परंतु शिस्तबद्व व साई विचार तळागाळात पोचविणारी बारामती तालुक्यातील एकमेव साईच्छा सेवा ट्रस्ट ची पालखी लक्ष वेधून घेत असते पालखी च्या माध्यमातून अध्यात्मिक समाधान मिळत आल्याचे आयोजक बिरजू मांढरे यांनी सांगितले बारामती चा चौफर विकास असताना अध्यात्मिक क्षेत्रात सुद्धा बारामती पाठीमागे नाही हे साई पालखीच्या माध्यमातून दाखवून दिल्याचे शहराध्यक्ष जय पाटील यांनी सांगितले. साई बाबांच्या विचार सरणीमुळे बिरजू मांढरे व मित्र परिवाराने उल्लेखनीय काम केले असल्याचे किरण गुजर यांनी सांगितले. या प्रसंगी पालखी सोहळ्यातील वाहक हरिभाऊ केदारी, गौंड व वासुदेव यांचा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अनिल सावळेपाटील यांनी केले. सौ सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवस व दीपावली पाडवा निमीत्त (बुधवार 26/10/2022) साईबाबांच्या जीवनावर आधारित ‘साई दरबार’ या जगातील सर्वात महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )