सोनगाव येथे कृषि संजीवनी मोहीम व कापूस पिक शेतीशाळा निमित्त शेतकरी संवाद कार्यक्रम

सोनगाव येथे कृषि संजीवनी मोहीम व कापूस पिक शेतीशाळा निमित्त शेतकरी संवाद कार्यक्रम

प्रतिनिधी – मौजे सोनगाव येथे कृषि संजीवनी मोहीम व कापूस पिक शेतीशाळा निमित्त शेतकरी संवाद आणि मार्गदर्शन गीतेवस्ती येथे आयोजित करण्यात आला. यावेळी तालुका कृषि अधिकारी बारामती मा. सौ.सुप्रिया बांदल, कृषि विज्ञान केंद्र चे संतोष करंजे, मंडळ कृषि अधिकारी मा.सि.के. मासाळ, कृषि पर्यवेक्षक राणे , कृषि पर्यवेक्षक भंडलकर, कृषि सहाय्यक श्री. बाजीराव कोळेकर , श्री सागर चव्हाण,श्री. गणेश पोंदकुले व सोनगाव, मेखळी पंचक्रोशितील शेतकरी बांधव उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना मा. ता.कृ.अ बांदल यांनी शेतकऱ्यांना आजचा पूरक कार्यक्रम विषय विविध पिकांचे तंत्रज्ञान प्रसार मूल्यसाखळी बळकटीकरण संदर्भात विविध विषयावर मार्गदर्शन केले व शेतकऱ्यांच्या उत्पादनात भरघोस वाढ कशी करावी याबाबत मार्गदर्शन व शंका निरसन केले. तसेच कृषि विज्ञान केंद्र चे संतोष करंजे यांनी कापूस पिक खत,कीड व रोग व्यवस्थापन या विषयी मार्गदर्शन केले, मा. मं.कृ.अ मासाळ यांनी महाडिबीटी अंतर्गत विविध योजनाचा परामर्श घेऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज करून लाभ घेणेबाबत आवाहन केले. तसेच कृषि सहाय्यक गणेश पोंदकुले यांनी माती परीक्षण गरज, फायदे व त्यानुसार एकात्मिक खत व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले.यावेळी सुरुवातीला मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाची सांगता सागर चव्हाण यांनी केली व आभार प्रगतशील शेतकरी श्री.संदेश गीते यांनी केले यांनी केले. या कार्यक्रमास सोनगाव व मेखळी मधील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन कृषि सहाय्यक सोनगाव व कृषि सहाय्यक मेखळी यांनी केले होते.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )