35 किलो गांजा ताब्यात : भिगवण पोलिसांची आणखी एक दमदार कामगिरी

प्रतिनिधी – इंदापूर तालुक्यातील डिकसळ येथे गांजा वाहतूक करणाऱ्या आरोपीला अटक करून भिगवन पोलिसांनी त्याच्या ताब्यातून ६ लाख १६ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुरूवार दि.१८ रोजी दुपारी 3 वाजून ३० मिनिटांनी सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे. या मध्ये सुनील अनिल जाधव ( रा.सासवड ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख पुणे ग्रामीण यांनी अमली पदार्थविरोधी मोहीम राबविण्याबाबत आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक दडस यांच्या मार्गदर्शनात एक पथक नेमण्यात आले होते. त्यानुसार भिगवण पोलीसांनी केलेल्या कारवाईत ३५ किलो वजनाचे अमली पदार्थ गांजा व एक होंडा शाइन असा एकूण सहा लाख १६ हजार २८० रुपये किमतीचा माल ताब्यात घेतला आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार सहा.पोलीस निरीक्षक विनायक पोलीस उपनिरीक्षक सुभाष रुपनवर, पोलीस अंमलदार दत्तु जाधव, रामदास जाधव, सचिन पवार, महेश उगले, अंकुश माने, हसीम मुलाणी, महेश बोरूडे, कल्पना वाबळे, होमगार्ड नितीन धुमाळ, पोलीस मित्र विशाल गुरगुळे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )