सुपे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिर संपन्न

सुपे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिर संपन्न

प्रतिनिधी : दिपक वाबळे, देऊळगाव रसाळ ,

सुपे कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबीर शुभारंभ मौजे नारोळी गाव येथे उत्साहात संपन्न झाला.

या विशेष श्रमसंस्कार शिबीर उद्घाटनाचे अध्यक्ष मा. सौ.सरपंच मोनाली संदीप भंडलकर तर प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहुल पाटील. व इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच नारोळी गावचे उपसरपंच दत्तात्रय मारुती ठमे नारोळी गावचे ग्रामपंचायत सर्व सदस्य ,प्रदीप गोसावी ,अक्षय कोंडे, सौ. मीना बाळासाहेब ढमे श्री.संभाजी ढमे , श्री.ज्ञानदेव सोनवणे ग्रामसेविका सौ.दिपाली हिरवे, पोलीस पाटील सौ. सुजता ढमे, विविध सहकारी सोसायटीचे चेअरमन श्री. बाबळे शिक्षक समितीचे अध्यक्ष श्री नवनाथ ढमे ,मुख्याध्यापक हनुमंत ढमे ,सामाजिक कार्यकर्ते सागर ढमे, संतोष ढमे,निखिल ढमे सुमित ढमे चंद्रकांत ढमे. तसेच राष्ट्रीय सेवा योजना श्रम संस्कार शिबिरार्थी सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि शिक्षक, प्राध्यापक भोसले ए. एस ,कोळी बसुराज , प्रा.लोणकर कार्यक्रमाधिकारी गांगुर्डे रामदास व श्री.शेखर लोखंडे श्री. प्रकाश सोनवणे नारोळी गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.गांगुर्डे रामदास यांनी तर कार्यक्रमाचे आभार प्रा. भोसले यांनी केले. कार्यक्रम कोरणाचे सर्व नियम पाळून संपन्न झाला.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )