सायंबाचीवाडी येथे डॉ पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती गट मिशन अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न..

सायंबाचीवाडी येथे डॉ पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती गट मिशन अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न..

प्रतिनिधी – महाराष्ट्र शासन कृषी विभाग व आत्मा पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 16/1/2024 रोजी सायंबाचीवाडी येथे डॉ पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती गट मिशन अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. यासाठी प्रमुख मार्गदर्शक श्री निलेश वायभसे सेंद्रिय शेती अभ्यासक व श्री आबासाहेब नाळे विभागीय व्यवस्थापक एस व्ही ऑरगॅनिक फाउंडेशन हे उपस्थित होते. यांनी शेतकरी गटाला सेंद्रिय शेती विषयी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच पाणी फाउंडेशन चे तालुका कॉर्डिनेटर श्री लाड यांनी नैसर्गिक शेती विषयी माहिती दिली. कृषी पर्यवेक्षक लोदाडे यांनीही मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमास सरपंच श्री जालिंदर भापकर व सायबांची वाडी व मासाळवाडी येथील शेतकरी गटाचे अध्यक्ष व गटातील शेतकरी उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित होते. सौ तृप्ती गुंड कृषी सहाय्यक साहेबाचीवाडी व श्री स्वप्नील गायकवाड कृषी सहाय्यक लोणी भापकर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले व चहा नाश्ता देऊन कार्यक्रमाची सांगता केली.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )