बारामतीत छत्रपती शाहू महाराज जयंती उत्सहात साजरी

बारामतीत छत्रपती शाहू महाराज जयंती उत्सहात साजरी

बारामती दि.२६: येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक या ठिकणी आरक्षणाचे जनक,लोककल्याणकारी राजा राजर्षी शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून त्रिशरण पंचशील ग्रहण करत समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली.

यावेळी,छत्रपती शाहू महाराजांनी या देशातील तळागाळातील लोकांसाठी काम करून त्यांना सामाजिक न्याय देण्याचं काम केलं.त्याच सोबत विधवा महिलांसाठी भरीव योगदान देत.बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कसे प्रयत्न केले.त्याचसोबत डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज यांच्या मध्ये असलेल्या नात्याच्या आठवणींना उजाळा देत.माजी नगरसेवक प्रा.रमेश मोरे,प्रकाश टेमघर,जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा सचिव प्रा.सुषमा जाधव यांनी शुभेच्छा पर मनोगत व्यक्त केले.
दरम्यान या कार्यक्रमाला विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीचे गौतम शिंदे,शुभम अहिवळे,चेतन साबळे,परीक्षित चव्हाण,कैलास शिंदे,चंद्रकांत भोसले तसेच जिजाऊ ब्रिगेड च्या प्रा.विद्या चव्हाण,प्रा.शिलाराणी रणदिवे,भारतीय बौद्ध महासभेचे बापूराव लोंढे,गोरख कांबळे,राजेश साबळे,मा.प.सवाने,सामाजिक कार्यकर्ते विजय साबळे,प्रमोद चव्हाण,रितेश गायकवाड,कैलास काकडे,प्रीतम गुळूमकर व आदी उपस्थित होते.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )