संजय गांधी निराधार योजनेची 154 प्रकरणे मंजूर

बारामती, दि. 13 :- संजय गांधी निराधार अनुदान योजना लाभार्थी निवड सभा 12 ऑगस्ट 2021 रोजी बैठक सभागृह, प्रशासकीय भवन, बारामती येथे समितीचे अध्यक्ष धनवान वदक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी तहसिलदार विजय पाटील, गट विकास अधिकारी राहूल काळभोर, संजय गांधी योजना नायब तहसिलदार महादेव भोसले, समितीचे सदस्य सुनिल बनसोडे, शिवराज माने, शहाजी दळवी, लालासो होळकर, निलेश मदने, अशोकराव इंगुले आदी उपस्थित होते.


सभेमध्ये एकूण 174 अर्जाची छाननी करण्यात आली. यामध्ये संजय गांधी योजनेचे 108 प्राप्त अर्जापैकी 102 मंजूर तर 06 अर्ज नामंजूर करण्यात आले. श्रावणबाळ योजनेचे 50 प्राप्त अर्जापैकी 38 अर्ज मंजूर तर 12 अर्ज नामंजूर करण्यात आले. इंदिरा गांधी योजनेचे प्राप्‍त 06 अर्जापैकी 06 अर्ज मंजूर करण्‍यात आले. राष्ट्रीय कुटूंब योजनेचे 10 प्राप्त अर्जापैकी 08 अर्ज मंजूर तर 02 नामंजूर करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय कुटुंब योजनेखालील 3 लाभार्थ्यांस धनादेश वाटप करण्यात आले.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )