श्री छत्रपती शाहू हायस्कूलमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी

श्री छत्रपती शाहू हायस्कूलमध्ये नागपंचमी उत्साहात साजरी

प्रतिनिधी – रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शाहू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज बारामती येथे नागपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमास प्रास्ताविकेतुन सौ सुनिता कोकरे यांनी नागपंचमी व वैज्ञानिक दृष्टिकोन याविषयी माहिती विद्यार्थ्यांना दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री पवार बी.एन. यांनी श्रावण महिन्यातील नागपंचमीतील सर्पाविषयी समज गैरसमज विद्यार्थ्यांना सांगितले, तसेच पर्यावरण समतोलामधील नागांचे महत्त्व सांगितले व वन्यजीव संरक्षण कायदे सांगितले. सर्व महिला विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी मनसोक्तपणे झिम्मा, फुगडी , गाण्यांचे फेर धरत कार्यक्रमाचा आनंद मनमुराद लुटला या कार्यक्रमास आर. एन .आगरवाल हायस्कूलचे प्राचार्य मा.श्री.पी.पी मोरे. विद्यालयाचे शिक्षक प्रतिनिधी श्री जी. आर. तावरे व सर्व शिक्षक महिला उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ तृप्ती कांबळे यांनी केले कार्यक्रमाचे आभार सोनाली हांडे यांनी मांडले.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )