शेतकरी उध्वस्त झाला तरी चालेल तुम्ही पेढे खाऊन आनंद साजरा करा – शशिकांत तरंगे.

शेतकरी उध्वस्त झाला तरी चालेल तुम्ही पेढे खाऊन आनंद साजरा करा – शशिकांत तरंगे.

प्रतिनिधी – इंदापूर महावितरण कंपनीचे अधिकारी यांना गांधीगिरी मार्गाने आज शशिकांत तरंगे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी पेढे भरून आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला बाजार भाव नाही या कारणामुळे शेतकरी हवालदिल आहे. शेतकऱ्याचं आरोग्य प्रचंड बिघडलेला आहे, दुधाला भाव नाही, साखर कारखानदार उसाचं देणे देत नाहीत, अशा परिस्थितीमध्ये महागाईच्या महामारी ने शेतकऱ्याचा जीव मेटाकुटीला आला असतानाच पावसाचे प्रमाण समाधानकारक नाही. उभी पिके केवळ वीज खंडित केल्याने जळू लागली, करपून गेली, तरी देखील वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती निर्माण होत नाही, केवळ बिलाच्या नावाखाली शेतकऱ्यांवर अन्याय केला जातोय, त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने शशिकांत तरंगे यांनी अधिकाऱ्यांना पेढा भरवून अनोखं आंदोलन केलं. लवकरच वीज तोडणी थांबली नाही तर इंदापूर तीव्र आंदोलन उभा करणार असल्याचं शशिकांत तरंगे यांनी मत व्यक्त केले.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )