शिर्सुफळ येथे कृषी विभागाच्या वतीने पिकविमा विषयी मार्गदर्शन

शिर्सुफळ येथे कृषी विभागाच्या वतीने पिकविमा विषयी मार्गदर्शन

प्रतिनिधी – दि.26/07/2022 रोजी मौजे शिर्सुफळ येथे ग्रामपंचायत कार्यालयात पंतप्रधान पीक विमा योजना खरीप हंगाम प्रचार व प्रसिद्धी सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मंडळ कृषी अधिकारी श्री. अरविंद यमगर यांनी क्रॉपसप,pmfme, एकरी 100 टन ऊस उत्पादन, कृषि विभागाच्या योजनाचे मार्गदर्शन केले. त्यानंतर विमा प्रतिनिधी श्री.नलावडे यांनी शेतकऱ्यांना पिक विमा करण्याबाबत अवाहन व मार्गदर्शन केले. यावेळी गावातील सरपंच श्री.अप्पासो आटोळे, उपसरपंच श्री.राजेंद्र आटोळे, ग्रामपंचायत सदस्य रमेश हिवरकर, कृषी सहाय्यक श्री. एस. एन वाघचौरे व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )