बारामती शहर राष्ट्रवादी युवकच्या वतीने कॉस्को बॉल टर्फ बॉक्स सामन्यांचे आयोजन

बारामती शहर राष्ट्रवादी युवकच्या वतीने कॉस्को बॉल टर्फ बॉक्स सामन्यांचे आयोजन

बारामती: कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळवण्यासाठी जिद्द चिकाटीची आवश्यकता असते त्यामुळे युवकांनी प्रयत्नाची पराकाष्टा करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २४ व्या वर्धापन दिन व २५ व्या रौप्य महोस्तवी वर्षानिमित्त बारामती शहर राष्ट्रवादी युवकच्या वतीने राष्ट्रवादी युवक चषक २०२३ कॉस्को बॉल टर्फ बॉक्स सामने चे आयोजन करण्यात आले होते उदघाटन प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस चे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर मार्गदर्शन करत होते. याप्रसंगी बारामती तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष जय पाटील, महिला अध्यक्षा अनिता गायकवाड, वनिता बनकर, सेवादल अध्यक्ष धीरज लालबिगे, ओबीसी सेल अध्यक्षा द्वारका कारंडे, सामाजिक विभाग अध्यक्षा रेश्मा ढोबळे, अल्पसंख्यांक विभाग अध्यक्ष असिफ बागवान, महाराष्ट्र राज्य विध्यार्थी वाहतूक संघ कार्याध्यक्ष तानाजीराव बांदल, व मा उपनगराध्यक्ष अभिजित जाधव, मा जयसिंग देशमुख नगरसेवक सुधीर पानसरे, सोशल मीडिया अध्यक्ष तुषार लोखंडे सोशल मीडिया जिल्हा उपाध्यक्ष अमोल कावळे व संघमालक प्रा अजिनाथ चौधर,आदीत्य हिंगणे,ओंकार जाधव,परवेज सय्यद, अभिजीत घाडगे, विशाल काळे आदी मान्यवर उपस्थित होते. शहरी भागातील खेळाडू साठी नगर पालिका प्रभाग पद्धतीने अत्याधुनिक मैदान च्या माध्यमातून कॉस्को बॉल सामने आयोजित करून खेळाडूंना नवीन ऊर्जा देऊन त्यांच्या मधील खेळाडूना सहकार्य व पाठींबा देण्याचे कौतुकास्पद काम अविनाश बांदल व राष्ट्रवादी युवकच्या टीमच्या माध्यमातून होत असल्याबद्दल प्रदीप गारटकर यांनी समाधान व्यक्त केले. शहरी लोक वस्ती वाढत असताना सर्वांनाच मोठ्या मैदानाकडे जाता येत नाही त्याचप्रमाणे काम करून आल्यानंतर घरच्या घरी जवळ खेळण्यासाठी अशी मैदानी उपलब्ध होत आहेत दिवसा व रात्री खेळण्यासाठी अशी मैदाने उपलब्ध होत आहे या माध्यमातून नवीन खेळाडू निर्माण होतो व खेळण्याचे समाधान मिळते व सांघिक भावना व खिलाडू वृत्ती वाढते त्यामुळे बारामती नगर परिषदेतील प्रत्येक प्रभागातील खेळाडूंसाठी व युवक एकत्र येण्यासाठी अशा सामन्याचा आयोजन करण्यात आले असुन बारामती नगर परिषद प्रभागातील 25 संघानी यामध्ये सहभाग घेतला असल्याचे शहर राष्ट्रवादी चे अध्यक्ष अविनाशजी बांदल यांनी सांगितले. शहर राष्ट्रवादीचा उपक्रम आदर्शवत असून या माध्यमातून खेळाडूंना एक नवीन प्रकारे सकारात्मक ऊर्जा मिळणार असल्याचे जय पाटील यांनी सांगितले. खेळामुळे मानसिक व शारीरिक संतुलन राहते वाढत्या नागरिकीकरणांमध्ये असे सामने होणे गरज असल्याचे मत तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी व्यक्त केले. याप्रसंगी जागा मालक शार्दूल शेळके आणि प्रायोजक आणि पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले तर आभार चारुदत्त काळे यांनी मानले.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )