शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी फक्त एकच दिवस नव्हे तर 365 दिवस शिक्षकांचे आभार मानायलाच हवे – अनिता गायकवाड

प्रतिनिधी ( इंद्रभान लव्हे) – राष्ट्रवादी काँग्रेस बारामती शहर महिला आघाडी यांच्या माध्यमातून 5 सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून राधेश्याम एन आगरवाल टेक्निकल हायस्कूल बारामती व छत्रपती शाहू हायस्कूल येथे शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यावेळी तेथे स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्ष आदरणीय श्री. सदाबापू सातव उपस्थित होते, त्यांचे मार्गदर्शन सर्व महिलांना लाभले. सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या तसेच त्यांच्या हातून असेच शिक्षणाचे महान कार्य घडत राहो ही सदिच्छा व्यक्त केली.
यावेळी अनिता गायकवाड अध्यक्ष बारामती शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस, उपाध्यक्षा ज्योति जाधव, सचिव रहना शेख, रेशमा डोबळे, शोभा मांडके, अनीता जगताप, पुनम रणदिवे, अनीता म्हस्के व इतर कार्यकर्ते उपस्थित होत्या.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )