जिल्हा परिषद निवडणूक विभाग व निर्वाचक गणांबाबत हरकती व सूचनेबाबत आवाहन

<em>जिल्हा परिषद निवडणूक विभाग व निर्वाचक गणांबाबत हरकती व सूचनेबाबत आवाहन</em>

पुणे दि.२९: जिल्हा परिषद निवडणूक विभागाचे व त्याअंतर्गत पुणे जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांमधील निर्वाचक गणनिहाय आरक्षण सोडत परिशिष्ट २४ मध्ये जिल्हाधिकारी कार्यालय पुणे ग्रामपंचायत शाखेसह सर्व तहसिल कार्यालय, सर्व पंचायत समिती कार्यालय, पुणे जिल्हा परिषद, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे, तसेच जिल्हाधिकारी कार्यालय आणि पुणे जिल्हा परिषद कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

राज्य निवडणूक आयोगाकडील सूचनेनुसार आरक्षण सोडतीवर हरकती स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे कक्ष तयार करण्यात आला आहे. आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमानुसार पुणे जिल्हा परिषद व त्याअंतर्गत असलेल्या १३ पंचायत समित्यांच्या निवडणूक विभाग व निर्वाचक गण आरक्षण सोडतीवर हरकती व सूचना ग्रामपंचायत शाखा, बी विंग, तिसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे कार्यालयीन वेळेत २९ जुलै ते २ ऑगस्ट २०२२ या कालावधीत स्वीकारण्यात येणार आहेत, असे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक पुणे जिल्हा नोडल अधिकारी संजय तेली यांनी कळविले आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )