विधायक उपक्रमातुन साजरा वडिलांचा स्मृतिदिन : निकत कुटुंबाने जपली सामाजिक बांधिलकी.

प्रतिनिधी – कै.भानुदास निकत यांच्या चतुर्थ स्मृति दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्याना वाह्या व पेनचे वाटप केले गेले. या कार्यक्रमासाठी करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सागर कुंजीर सहकुटुंब उपस्थित होते. यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य मनोहर झोळ, धापटे आबा, हरिदास कांबळे, उपसरपंच रेवननाथ निकत, रघुनाथ निकत, विकास निकत, धुळाजी कोकरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेश ताकमोगे, उपाध्यक्ष दादा मगर, माजी अध्यक्ष शिवाजी कोकरे, सुभाष निकत, बिभीषण निकत, अशोक गाडे, हनुमंत पवार, युवराज मगर, अप्पासो कोलते उपस्थित होते. यावेळी ह.भ.प रामभाऊ महाराज निंबाळकर यांचे सुश्राव्य किर्तन झाले. त्यांना उंदरगाव येथील भजनी मंडळ रघुनाथ पाटील, बिभीषण गरदडे, दशरथ गोडगे, बबन जावळे, हनुमंत कांबळे, विष्णु कांबळे, कल्याण निकत, रामकृष्ण चोरमले, बाळासाहेब निकत, शाहिर बबन खरात यांची मोलाची साथ लाभली. यानंतर उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते जि.प.शाळा उंदरगाव येथील मुलांना वाह्य व पेन चे वाटप करण्यात आले. तसेच मुख्याध्यापक श्री रामहरी ढेरे यांना पंजाबराव देशमुख आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा व चि.महेश कोलते यांची झोरियंट कंपनी पुणे मध्ये ऑटोमेशन इंजीनियर पदी निवड झालेबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. विजय निकत व प्रा राजेंद्र निकत यांनी मनोगत व्यक्त करुन आभार मानले सूत्रसंचालन श्री अशोक भोसले यांनी केले.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )