बाल लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस तीन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

बाल लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस तीन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

प्रतिनिधी- 27 एप्रिल 2018 रोजी बारामती शहरात चिमणशा मळा येथे एका पाच वर्षाच्या मुलीला घरात चित्रपट दाखवण्याच्या आमिषाने बोलून आरोपी आजिनाथ सावळाराम शिंदे वय 55 वर्ष राहणार चिमणशा मळा याने स्वतःचे कपडे उतरून. लैंगिक अत्याचार करण्याच्या तयारीत असताना आजूबाजूच्या मुलांनी पाहिले व सदरची घटना तिच्या आईस सांगितले. तात्काळ त्यांनी सदर ठिकाणी जाऊन पुढील अत्याचार थांबवला नंतर सदर पीडित महिलेच्या आईने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली विनयभंग व बाललैंगिक अत्याचार कलम 8 ,12 प्रमाणे गुन्हा नोंद झाला महिला पोलीस उपनिरीक्षक वर्षा जगदाळे यांनी आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र कोर्टात तात्काळ सादर केले. या केसमध्ये सर्व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार हे आपल्या साक्षीवर टिकून राहिली.

दोषारोपपत्र कोर्टात सादर केल्यानंतर पुढे पोलीस ठाण्यात तर्फे सदर केसच्या कोर्टात चालणाऱ्या ट्रायल वर पोलीस ठाण्याची लक्ष असावे म्हणून केस ऑफिसर स्कीम माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी सुरू केलेली आहे. त्या अनुषंगाने पोलीस ठाण्यात सध्या नेमणुकीला असलेल्या प्रत्येक अधिकाऱ्यांना कोर्टात चालणाऱ्या महत्त्वाच्या केसेस वाटून दिलेले आहेत तपास केलेले अधिकारी बदलून गेले तरी प्रत्येक केस वर साक्षीदारांवर दबाव येऊ नये तसेच समन्स वॉरंट बजावणी होती का नाही हे पाहण्याची जबाबदारी त्याच्यावर दिलेली आहे. त्यामुळे आता प्रत्येक ट्रायल के पोलिसांचे लक्ष असते. तसेच याही केस वर केस अधिकारी म्हणून पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांनी स्वतः काम पाहिले. कोर्टातील साक्षीदारांना कडून वदवून घेण्यासाठी कोर्ट पैरवी म्हणून व्ही एल लोकरे मॅडम व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नलावडे यांनी उत्कृष्ट काम केले. तसेच पोलिस कर्मचारी निकम यांनी वेळेत समन्स बजावणी केलेली आहे तसेच सरकारतर्फे सरकारी वकील संदीप ओहोळ यांनी कोर्टामध्ये अतिशय चांगला युक्तिवाद केला. व माननीय न्यायाधीश विशेष न्यायालय श्री शहापुरे यांनी या आरोपीला बारामती शहर गुन्हा नंबर 202/ 18 कलम 354 ए बाललैंगिक अत्याचार कलम 8 12 मध्ये 3 वर्ष सश्रम कारावास व सहाशे रुपये दंड व दंड वसूल करून पिढीला देण्याबाबतचा आदेश केलेला आहे आरोपीला रावण ताब्यात घेऊन रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे उत्कृष्ट काम करणाऱ्या महिला पोलिस कर्मचारी लोकरे व निकम यांचा बारामती शहर पोलीस ठाण्यात सत्कार करण्यात आला. याप्रकारे शिक्षा लागल्यानंतर समाजातील अपप्रवृत्तींना आळा बसून या प्रकारच्या गुन्ह्यांना प्रतिबंध होण्यास मदत होणार आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )