विद्यार्थ्यांनी वाचन व्यासंग वाढवावा – श्री सणस यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

विद्यार्थ्यांनी वाचन व्यासंग वाढवावा – श्री सणस यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

टेक्निकल विद्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

प्रतिनिधी – बारामती येथील राधेश्याम एन आगरवाल टेक्निकल विद्यालय व ज्युनिअर कॉलेज बारामती येथे विविध उपक्रमांनी महापरिनिर्वाण दिन करण्यात आला.भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.सांस्कृतिक विभागप्रमुख सौ.उर्मिला भोसले यांनी प्रस्ताविकेतून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली,तर इ 8 वी ब च्या विद्यार्थांनी यावेळी मराठी,हिंदी व इंग्रजी मधून बाबासाहेबाविषयी आपले मनोगत व्यक्त केले.तसेच विद्यार्थिनींनी बाबासाहेब यांच्या जीवनावर आधारित कविता सादर केली. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा घेण्यात आली.तसेच विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री सणस यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तक वाचनाची आवड याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तसेच त्यांच्या जीवनकार्याची माहिती सांगून विद्यार्थ्यांनी वाचनाची सवय लावण्याचे आवाहन केले.यावेळी विद्यालयाचे प्रा.श्री पोपट मोरे, उपमुख्याध्यापक श्री कल्याण देवडे व इतर सर्व सेवक वर्ग उपस्थित होते.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )