मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन..

मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन..

प्रतिनिधी – यशदा पुणे येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत जागतिक बँक अर्थसाहित मा बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प SMART प्रकल्प मधून कृषी विभागाची संस्थात्मक क्षमता वाढविणे, या घटका अंतर्गत “यशदा”, पुणे येथे मंगळवार दि. २३ जानेवारी रोजी सकाळी ११ ते ५ या वेळेत एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेमध्ये एफपीसींच्या योजनेविषयी महत्त्वाची धोरणे, उद्देश, ध्येय, नियमावली, मार्गदर्शक सूचना, मुख्य कार्य व ती पार पाडण्यासाठी अवलंबण्यात येणाऱ्या मुख्य कार्यपद्धती तसेच आनुषंगिक मापदंड, संस्थात्मक रचनेचा आकृतीबंध, मनुष्यबळ व सध्या जाणवणारी मुख्य आव्हाने, तसेच संधी व बलस्थाने आणि पुढील वाटचालीबाबत मार्गदर्शक सूचना यावर चर्चा व प्रश्नोत्तरे झाली.
सदर कार्यशाळेसाठी महाराष्ट्रातून ३० उत्कृष्ट अधिकारी, संस्था प्रतिनिधी व प्रगतशील शेतकरी यांची निवड केली होती. सदर कार्यशाळेस सर्व सदस्यांनी उपस्थिती लावली.
कृषी विभागाची संस्थात्मक क्षमता वाढ करणे तसेच महाराष्ट्राचे भविष्यातील शेती धोरण ठरविणेसाठी सदर कार्यशाळेत मा. डी एल तांभाळे(संचालक कृषी-आत्मा), मा संतोष आळसे(प्रकल्प संचालक-डॉ पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन, अकोला), मा वसंत बिनवडे(तंत्र अधिकारी, वि.कृ.स.स., पुणे), मा सुनील बोरकर(सह संचालक-कृषी, पुणे), मा आरीफ शहा(जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम), मा हनुमंत शिंदे(उपसंचालक प्रशिक्षण, पुणे), श्रीमती अलका गायकवाड(जी.अ.कृ.अ., पुणे), मा विजय हिरेमठ(प्रकल्प संचालक-आत्मा, पुणे), मा. वैभव तांबे(कृषी अधिकारी, आयुक्तालय पुणे), मा दत्तात्रय गायकवाड (कृषी अधिकारी, बारामती), मा अरविंद जगताप (सचिव, एपीएमसी बारामती), मा प्रल्हाद वरे (सदस्य, सेंद्रिय शेती धोरण कमेटी व विपणन समिती महाराष्ट्र राज्य), श्रीमती सुनीता नांदगुडे (प्रगतशील महिला शेतकरी, हवेली), मा जगन्नाथ मगर(सेंद्रिय शेतकरी, अकलुज), मा. गणेश बाबर(प्रगतशील शेतकरी, वाई), मा अभय निलाखे(इम्पोर्ट एक्सपोर्ट तज्ञ, शिंगणापूर) तसेच इतर अधिकारी व शेतकरी उपस्थित होते. यातील बरेच जणांनी आपापली मते व्यक्त केली.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )