वासुंदे येथे शेतकऱ्यांना ज्वारी निविष्ठा चे वाटप

वासुंदे येथे शेतकऱ्यांना ज्वारी निविष्ठा चे वाटप

प्रतिनिधी :- राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम सन 2021-22 अंतर्गत वासुंदे (ता – दौंड) येथील शेतकरी गटाला वाटप ज्वारी बियाण्यांचे वाटप करण्यात आले असून सुमारे पन्नास शेतकऱ्यांना 20 हे. क्षेत्रावर प्रकल्प राबविणार असल्याची माहिती कृषि पर्यवेक्षक पी. एम.चिपाडे यांनी दिली. या प्रकल्पातील सहभागी शेतकऱ्यांना ज्वारी बियाणे, अझोटोबॅक्टर, पी.एस.बी ही जैविक खते, एकात्मिक अन्नद्रव्य अंतर्गत झिंक विरघळणारे जिवाणू , जैविक कीड नियंत्रण अंतर्गत फेरोमन सापळे , पीक संरक्षण साठी निंबोळी अर्क आदी निविष्ठांचा पुरवठा उपविभागीय कृषि अधिकारी वैभव तांबे , तालुका कृषि अधिकारी राहुल माने , मंडळ कृषि अधिकारी महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कृषि विभागाद्वारे करण्यात येणार आहे . या संबधित शेतकऱ्यांना बियाण्यांचे वाटप माजी उपसरपंच दिलीप जगताप , प्रगतशील शेतकरी प्रभाकर जांबले , यांच्या हस्ते करण्यात आले . या वेळी प्रकल्पात सहभागी शेतकरी बापूराव खुरंगे , महेश धुमाळ , सुरेश जांबले , शामराव हाजबे , इ.उपस्थित होते. या वेळी कृषि सहायक प्रकाश लोणकर यांनी ज्वारी बियाणे वरती बीजप्रक्रिया कशी करावी याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. या वेळी प्रकाश लोणकर यांनी बोलताना सांगितले की, प्रकल्प कालावधीत माती परीक्षण, शेतकरी प्रशिक्षण , शेतिदिन, व तज्ञांचे मार्गदर्शन व शास्त्रज्ञ भेट हे उपक्रम राबविले जाणार आहेत .

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )