वसुंधरा वाहिनीच्या वतीने लसीकरण जनजागृती अभियान संपन्न

प्रतिनिधी – स्मार्ट संस्था दिल्ली, युनिसेफ आणि वसुंधरा वाहिनी बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने १३ सप्टेंबर पासून Vaccine Hesitency Campaign राबवले जात आहे. या अभियानामध्ये आधार मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल कुर्डूवाडी सेंटरचे कोविड रुग्णांवर उपचार करणारे तज्ञ डॉ. विनायक रुपदास यांचा लसीकरणाविषयी समाजामध्ये असलेले गैरसमज दूर करणारा माहितीपर कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.
याविषयीचे narrowcasting टेक्स्टाईल पार्क – कॉटनकिंग बारामती येथे घेण्यात आले या कार्यक्रमांसाठी जवळपास ५०० महिला कर्मचारी सहभागी झाल्या होत्या.
लसीकरणा विषयी लोकांच्या मनामध्ये असलेले गैरसमज, भीती, अज्ञान दूर करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन विद्याप्रतिष्ठानच्या विश्वस्त माननीय सौ. सुनेत्रा अजित पवार यांनी केले.
विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अॅडवोकेट अशोक प्रभुणे, खजिनदार श्री युगेन्द्र पवार, सचिव अॅडवोकेट निलिमाताई गुजर तसेच व्ही.आय. आय.टी चे संचालक डॉ. आनंद देशमुख यांनी या कार्यक्रमासाठी प्रोत्साहन दिले.
वॅक्सीनचे दोन्ही डोस घेतलेल्या श्रोत्यांना वसुंधरा वॅक्सीन स्टार या उपाधीने रेडिओ वरून गौरवण्यात आल्याचे वसुंधरा वाहिनीच्या केंद्र प्रमुख सौ. आशा मोरे यांनी सांगितले.
कार्यक्रमासाठी कॉटनकिंगचे जनरल मॅनेजर श्री. गायकवाड यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कॉटनकिंगच्या रोहिणी निंबाळकर, वसुंधरा वाहिनीच्या आर.जे. स्नेहल कदम व ऋतुजा आगम, चेतन धुमाळ, यांनी सहकार्य केले. हिरकणीचे श्री अक्षय साबळे व सौ रेश्मा साबळे हे या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )