वंचित बहुजन युवा आघाडी पुणे जिल्हाध्यक्ष पदी मंगलदास निकाळजे तर महासचिव पदी प्रतिक चव्हाण यांची निवड

वंचित बहुजन युवा आघाडी पुणे जिल्हाध्यक्ष पदी मंगलदास निकाळजे तर महासचिव पदी प्रतिक चव्हाण यांची निवड

प्रतिनिधी – वंचित बहुजन युवा आघाडी पुणे जिल्हा पूर्व जिल्हाध्यक्ष पदी मंगलदास निकाळजे तर महासचिव पदी प्रतिक चव्हाण यांची निवड करण्यात आली.पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने प्रदेशाध्यक्ष मा.निलेश विश्वकर्मा यांनी निवडीचे पत्र देवून निवड केली आहे. मंगलदास निकाळजे हे समाजातील लोकांवर झालेल्या अन्याय अत्याचाराबाबत जाब विचारण्यासाठी आघाडीवर असतात. सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा विषयक कार्यक्रमाचे आयोजन करीत असतात. संघटन कौशल्य असल्याने अतुट अशी युवकांची फळी निर्माण केलेली आहे व त्यांच्या मध्ये संघटन कौशल्य मजबूत आहे तसेच युवकांचे प्रश्न ते सातत्याने मार्गी लावत असतात श्री. निकाळजे यांनी ब्ल्यू पँथर सामाजिक संघटनेच्या संस्थापक/ अध्यक्ष पदाच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात नावलौकीक मिळविला आहे. अनेक मोर्चे, आंदोलने, पाठपुरावा करून अनेक प्रकरणात त्यांना यश मिळाले आहे.
निकाळजे यांनी केलेल्या कामाची पावती म्हणून त्यांची वंचित बहुजन युवक आघाडीच्या पुणे जिल्हा पूर्व जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे तसेच पत्रकारिता क्षेत्रात अग्रसर असल्याने व युवक वर्गामध्ये चांगला संपर्क असल्यामुळे जिल्हा महासचिव पदी प्रतिक चव्हाण यांची निवड करण्यात आली. याआधी त्यांनी बारामती तालुका सचिव पदी काम केले आहे.तसेच जिल्हा कार्यकारणी मध्ये गणेश थोरात-उपाध्यक्ष, किरण मिसळ-उपाध्यक्ष, ऍड. मंगेश लोंढे- सचिव, कृष्णा साळुंके-सहसचिव, सुरज कोरडे-संघटक, रोहित माने-संघटक व सचिन कांबळे-प्रसिद्धी प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. युवक वर्ग पक्षाकडे कसा आकर्षीला जाईल यासाठी काम करणार आहे. पुणे जिल्ह्यात येणाऱ्या काळात निवडणूकांमध्ये वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकवून अॅड. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांचे हात मजबूत करणार असल्याचे निवडी प्रसंगी निकाळजे यांनी सांगितले.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )