राष्ट्रीय मतदार दिवस ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात येणार

राष्ट्रीय मतदार दिवस ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात येणार

पुणे, दि. २१:- कोविड-१९ च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन २५ जानेवारी रोजी १२ वा राष्ट्रीय मतदार दिवस ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय मतदार दिवस राज्य, जिल्हा तसेच मतदान केंद्रस्तरावर साजरा करण्यात येणार आहे. या वर्षीच्या राष्ट्रीय मतदार दिवसासाठी आयोगाकडून “सर्वसमावेशक, सुलभ आणि सहभागपूर्ण निवडणूका” (Making Elections Inculsive, Accessible and Participative) ही संकल्पना निश्चित करण्यात आली आहे. या विषयाच्या अनुषंगाने दिव्यांग, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि समाजाच्या उपेक्षित घटकांतील व्यक्ती यांना विचारात घेऊन मतदार जागृती उपक्रम येणार असल्याची माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सांवत यांनी दिली आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )