कृषी आयुक्त धीरज कुमार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय कृषी दिनाचे आयोजन

<em>कृषी आयुक्त धीरज कुमार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय कृषी दिनाचे आयोजन</em>

पुणे, दि. १: माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिनाचे औचित्य साधून कृषी आयुक्त धीरज कुमार यांच्या अध्यक्षतेखाली ‘राज्यस्तरीय कृषी दिन’ कृषी आयुक्तालयाच्या पद्मश्री सभागृहात साजरा करण्यात आला.

यावेळी संचालक दिलीप झेंडे, सुभाष नागरे, विकास पाटील, सहसंचालक पोपट शिंदे, सुधीर ननावरे, संबधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी, सूक्ष्म प्रकिया उद्योजक तसेच राज्यातील शेतकरी उपस्थित होते.

कृषी आयुक्त श्री. कुमार अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, कृषी विभागाकडील विविध उपक्रम शेतकरी व शेती संबंधीत प्रक्रिया उद्योजकांपर्यंत पोहचवा. कृषी क्षेत्राचा विकास होण्यासाठी या घटकांना समाविष्ट करुन घेणे आवश्यक असून विभागातील सर्व यंत्रणांनी त्यादृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

कृषी आयुक्त श्री. कुमार यांच्या हस्ते अन्न प्रक्रिया उद्योगातील यशस्वी महिला उद्योजिका व पौष्टीक तृणधान्य उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत २५ जून २०२२ ते १ जुलै २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या कृषी संजीवनी मोहिमेचा समारोप यावेळी करण्यात आला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )