राष्ट्रवादी दिव्यांग सेलची बैठक व नियुक्ती पत्र वाटप कार्यक्रम संपन्न…

राष्ट्रवादी दिव्यांग सेलची बैठक व नियुक्ती पत्र वाटप कार्यक्रम संपन्न…

प्रतिनिधी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून स्थापन झालेल्या दिव्यांग सेलच्या पुणे जिल्हा कार्यकारणीची बैठक व नियुक्तीपत्र समारंभ कार्यक्रम रोजी 19 /6/ 2023 रोजी पुणे (धनकवडी) या कार्यालयांमध्ये आयोजित झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर तसेच प्रमुख पाहुणे महाराष्ट्र उपाध्यक्ष दिव्यांग सेलचे मिलिंदजी साळवे, व पुणे जिल्हा दिव्यांग सेल जिल्हाध्यक्ष पुष्पाताई गोसावी तसेच पुणे जिल्हा वरीष्ठ उपाध्यक्ष कैलासजी शिंदे व जिल्हा उपाध्यक्ष गणेशजी शेडगे हे उपस्थित होते. या ठिकाणी प्रदीप गारटकर बोलताना म्हणाले की या दिव्यांग सेलचा आतापर्यंतचा आलेख पाहता दिव्यांग सेल हा अतिशय चांगल्या पद्धतीने पुणे जिल्ह्यामध्ये काम करीत आहे. या कार्यक्रमाला सर्व तालुका अध्यक्ष व त्यांचे सर्व पदाधिकारी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. तसेच या ठिकाणी पुण्याला येऊन ज्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र घेता येत नव्हते अशा पदाधिकाऱ्यांचे नियुक्तीपत्र हे 20/06/2023 रोजी बारामती ठिकाणी बारामती शहर कार्यालय या ठिकाणी शहराध्यक्ष जय पाटील, महिला अध्यक्ष अनिता गायकवाड, दिव्यांग सेलचे पुणे जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष कैलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम सोहळा करण्यात आला. यावेळी शहर आध्यक्ष जयदादा पाटिल बोलताना म्हणाले की हा कार्यक्रम दिव्यांग सेलने सर्व सेलच्या अगोदर आपली पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याबद्दल बारामती शहरातील हा पहिला सेल झाला आहे. यावेळी बोलताना पुणे जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष कैलास (भाऊ) शिंदे बोलले की बारामती शहरांमध्येच काही दिवसातच या ठिकाणी पुणे जिल्ह्याचा जाहीर मेळावा देखील घेण्याचा हा आमचा मानस आहे. बारामतीकरांच्या नावाने पूर्ण जिल्ह्यामध्ये बारामती पॅटर्न हा राबवला जाईल याकडे आम्ही प्रामुख्याने लक्ष देईल. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेलच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष संजय आहिवळे, बारामती तालुकाध्यक्ष हरिभाऊ जाधव, शहर अध्यक्ष प्रवीण (आप्पा) गालींदे, उपाध्यक्ष नामदेवराव चांदगुडे, कार्याध्यक्ष दत्ताभाऊ शिंदे तसेच इंदापूर तालुक्याचे दिव्यांग सेलचे नेते बापूराव ढमाळ व महिला उपाध्यक्ष दीक्षा साळवे व सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी आभार नीता ढवाण पाटील यांनी मांडले.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )