मोरगाव येथे शेतीशाळा वर्ग व रब्बी हंगाम पीक उत्पादन वाढ मोहीमेस सुरवात…

मोरगाव येथे शेतीशाळा वर्ग व रब्बी हंगाम पीक उत्पादन वाढ मोहीमेस सुरवात…

प्रतिनिधी – आत्मा अंतर्गत शेतीशाळा वर्ग व रब्बी हंगाम पीक उत्पादन वाढ मोहीम कार्यक्रम मोरगाव फार्मर्स प्रोड्युसर कंपनी, मोरगाव येथे कृषी पर्यवेक्षक बापूराव लोदाडे यांच्या उपस्थितीत पार पडला. ऊस लागवड तंत्रज्ञान मध्ये हंगाम व जमिनीचा प्रकारा नुसार वाण निवड, वाढीच्या अवस्थे नुसार खत व्यवस्थापन, हुमणी नियंत्रण बाबत सखोल मार्गदर्शन अनिल काळोखे यांनी केले. ज्वारी बीज प्रक्रिया चे महत्त्व व प्रत्येक्षिक विक्रम पवार यांनी दिले. लम्पी स्किन चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी बद्दल डॉ. गावडे यांनी उपस्थितांना माहिती दिली. चिंतामणी परकाळे यांनी कांदा लागवड तंत्रज्ञान मध्ये कांदा रोपवाटिका नियोजन, कीड व रोग व्यवस्थापन, कांद्याची साठवणूक क्षमता वाढीसाठी मर्यादित नत्र खत चा वापर व सल्फर खत चा योग्य वापर बाबत मार्गदर्शन केले. पोपट तावरे यांच्या सूर्यफूल प्लॉट ला भेट देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन प्रसाद तावरे कृषी सहाय्यक मोरगाव यांनी केले तर बबन तावरे, संजय नेवसे, शंकर ढोले ई. शेतकरी बंधाव कार्यक्रमास उपस्थित होते.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )