रयत शिक्षण संस्थेच्या टेक्निकल विद्यालयात महाभोंडला

रयत शिक्षण संस्थेच्या टेक्निकल विद्यालयात महाभोंडला

प्रतिनिधी – बारामती येथील राधेश्याम एन आगरवाल टेक्निकल विद्यालय व ज्युनिअर कॉलेज या ठिकाणी शारदीय नवरात्रोत्सव निम्मित महाभोंडल्याचे आयोजन करण्यात आले होते. इ 5 वी ते 12 पर्यंतच्या 950 मुली या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीचा परिचय होतो, महत्व पटवून सांगितले जाते आणि आपला सांस्कृतिक वारसा जपला जातो व त्यातून एकीची भावना निर्माण होते. आपली परंपरा व संस्कृती एका वेगळ्या पद्धतीने या मूल्यांची रुजवण विद्यार्थामध्ये होते. सर्व मुली व महिला शिक्षिका यांच्या एकत्रित सहभागाने हा भोंडला खेळला गेला. या कार्यक्रमात विविध प्रकारच्या गीतांचा कार्यक्रम पार पडला. विद्यार्थिनींनी डब्यांमध्ये आणलेल्या विविध खाऊ खिरापत म्हणून वाटण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभागाच्या वतीने करण्यात आले होते. प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य श्री पोपट मोरे, उपमुख्याध्यापक श्री कल्याण देवडे, पर्यवेक्षक श्री सणस, जेष्ठ शिक्षक आनंदराव करे, सुनील चांदगुडे, अर्जुन मलगुंडे, सुदाम गायकवाड, जेष्ठ शिक्षिका सौ.जयश्री हिवरकर, अर्चना पेटकर, शेख मॅडम,स्मिता काळभोर, मीनाक्षी वाघमारे, सुजाता गाडेकर व इतर सर्व महिला शिक्षिका यांच्या वतीने पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी सर्व विद्यार्थामध्ये उत्साहाचे वातावरण होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.ऊर्मिला भोसले यांनी केले.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )