महाराष्ट्रभर गाजलेल्या बारामती मधील अपहरण व विनयभंग या गंभीर गुन्ह्यातील अरफाज आत्तार यास जामीन मंजूर…

महाराष्ट्रभर गाजलेल्या बारामती मधील अपहरण व विनयभंग या गंभीर गुन्ह्यातील अरफाज आत्तार यास जामीन मंजूर…

ॲड.मेघराज नालंदे व ॲड. ओंकार इंगुले यांच्या युक्तीवादामुळे…..

बारामती- गेल्या काही दिवसांपूर्वी बारामती मध्ये लव्ह जिहाद, छेडछाड, हे सोशल मिडीयावर सुसाटपणे प्रकरण गाजले होते विशेषत: विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या निवासस्थानाबाहेर युवतीला मारहाण प्रकरण समोर आले होते. त्या अरफाज सादिक आतार या युवकाला ॲड. मेघराज नालंदे व अॅड. ओंकार इंगुले यांनी केलेल्या युक्तीवादामुळे मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश जे. पी. दरेकर यांनी शुक्रवार दि.१२ मे २०२३ रोजी जामीन मंजूर केला आहे.

या प्रकरणात अरफाज आत्तार यांच्यावर बारामती शहर पोलीस स्टेशनला भा.द.वि.कलम ३५४, ३०८, ३५४ (ड), , ३६३, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातुन धार्मिक तेढ निर्माण करण्याचा काहींचा प्रयत्न होता. श्रद्धा वालकर ते लव्ह जिहादपर्यंत विषय रंगला होता. मूळ फिर्यादी सरकार पक्षाच्या वतीने मे. कोर्टासमोर पुरावे सादर केले. मात्र अॅड. मेघराज नालंदे व ॲड. ओंकार इंगुले यांनी ते खोडून काढल्याने मे. कोर्टाने अरफाजला जामीन मंजूर केला.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )