संजय गांधी निराधार योजनेची 231 प्रकरणे मंजूर

संजय गांधी निराधार योजनेची 231 प्रकरणे मंजूर

बारामती, दि. 28:- संजय गांधी निराधार अनुदान योजना लाभार्थी निवडीसाठी 28 मार्च रोजी प्रशासकीय भवन बारामती येथे झालेल्या बैठकीत 231 प्रकरणांना मंजुरी देण्यात आली.

समितीचे अध्यक्ष धनवान वदक यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत तहसिलदार विजय पाटील, नायब तहसिलदार सुवर्णा ढवळे, समितीचे सदस्य सुनिल बनसोडे, शिवराज माने, शहाजी दळवी, निलेश मदने, प्रविण गालिंदे, जिवना मोरे, नुसरत इमामदार आदी उपस्थित होते.

बैठकीत एकूण 245 अर्जाची छाननी करण्यात आली. यामध्ये संजय गांधी योजनेच्या 162 प्राप्त अर्जापैकी 154 मंजूर तर 8 अर्ज नामंजूर करण्यात आले. श्रावणबाळ योजनेचे 71 प्राप्त अर्जापैकी 65 अर्ज मंजूर तर 6 अर्ज नामंजूर करण्यात आले. इंदिरा गांधी योजनेचे प्राप्त 12 अर्ज मंजूर करण्यात आले.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )