महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सावानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न : 55 बाटल्यांचे रक्तसंकलन

महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सावानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न : 55 बाटल्यांचे रक्तसंकलन

बारामती ( वार्ताहर ) महात्मा जोतीबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सावानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न झाले. या शिबिरामध्ये युवा ज्येष्ठ आणि महिला सर्व एकत्रित करून 55 बाटल्यांचे रक्तदान झाले…

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समिती बारामती यांच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते यावेळी शिबिराचे उद्घाटन माजी नगरसेवक सुधीर सोनवणे यांच्या हस्ते तर माजी उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र बनकर, सामाजिक कार्यकर्ते किशोर सोनवणे, भोला जगताप, मुख्याधिकारी महेश रोकडे, अनिकेत मोहिते, नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे, निलेश मोरे, सचिन साबळे ,अमोल वाघमारे ,बबलू जगताप, तसेच इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

यावेळी अनेक रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. शिबिराचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समिती बारामती यांनी तर रक्तदान शिबीर यशस्वी होण्यासाठी अध्यक्ष सिद्धार्थ सोनवणे, कार्याध्यक्ष भास्कर दामोदरे, उपाध्यक्ष विराज अवधूते,संदीप रणदिवे,आदित्य सोनवणे, खजिनदार विशाल गायकवाड, सचिव संजय वाघमारे,सहखजिनदार शंकर सोनवणे, साहिल मोरे स्वप्नील गायकवाड शुभम गायकवाड व शुभम काकडे यांनी परिश्रम घेतले.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )