बारामतीत राजकमल तरुण मंडळ ट्रस्टच्या वतीने कला महोत्सवाचं आयोजन; चित्रकला स्पर्धेत ४५० विद्यार्थ्यांचा सहभाग..

बारामतीत राजकमल तरुण मंडळ ट्रस्टच्या वतीने कला महोत्सवाचं आयोजन; चित्रकला स्पर्धेत ४५० विद्यार्थ्यांचा सहभाग..

बारामती : प्रतिनिधी, बारामती येथील राजकमल तरुण मंडळ ट्रस्टच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त कला महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय.. या महोत्सवाअंतर्गत रविवारी श्री.महावीर भवन येथे चित्रकला स्पर्धा पार पडल्या. त्यामध्ये जवळपास ४५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. तर मंगळवार दि. २६ सप्टेंबर रोजी रांगोळी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे.
बारामतीतील राजकमल तरुण मंडळ ट्रस्टच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्यामध्ये गणेशोत्सवाचं औचित्य साधत विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळावा या उद्देशानं कला महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यात रविवारी महावीर भवन येथे चित्रकला स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत ४५० विद्यार्थी सहभागी झाले होते.
चित्रकला स्पर्धेतील प्रथम विजेत्याला बारामती इंडस्ट्रीज लि. चे निलेश कुलकर्णी यांच्या वतीने सायकल देण्यात येणार आहे. द्वितीय क्रमांकाला हितेश पटेल यांच्याकडून स्मार्ट वॉच दिले जाणार आहे. तर तृतीय क्रमांकाला राजकमल तरुण मंडळ ट्रस्टकडून बॅग आणि आर्ट कीट असे बक्षिस दिले जाणार आहे.
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बारामतीतील सर्व कला शिक्षक, राजकमल तरुण मंडळ ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, क्रिएटिव्ह ॲकॅडमीचे गोपाळ महामुनी आणि मित्र परिवाराने विशेष परिश्रम घेतले. दरम्यान, मंगळवार दि. २६ सप्टेंबर रोजी या महोत्सवांतर्गत रांगोळी स्पर्धा पार पडणार आहेत.श्री मुनिसुव्रतनाथ दिगंबर जैन देवस्थान ट्रस्ट यांनी अल्पदरात श्री.महावीर भवन उपलब्ध करून दिले.त्या बद्दल ट्रस्ट चे श्री.धवल अभय शहा(वाघोलिकर)यांनीआभार व्यक्त केले.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )