भावाने ३८ वार करून केला खुन ! बारामती तालुका पोलीसांनी दोन तासात आरोपीच्या आवळल्या मुसक्या

भावाने ३८ वार करून केला खुन ! बारामती तालुका पोलीसांनी दोन तासात आरोपीच्या आवळल्या मुसक्या

प्रतिनिधी – बारामती तालुका पोलीस स्टेशन हददीमध्ये दि. ०१ ऑगस्ट रोजी दुपारी १२.१५ वा चे सुमारास मौजे रुई गावामध्ये गजानन पवार याचा त्याचा राहात्या घरी खुन झाल्याची बातमी बारामती तालुका पोलीस स्टेशनला माहिती मिळाली. माहिती मिळताच मा. पोलीस निरीक्षक श्री महेश ढवाण सो यांनी पो स्टे स्टाफ सह घटनास्थळी भेट दिली. सदरची घटना ही प्रत्यक्ष कोणी पाहीली नसल्याने पोलीस निरीक्षक श्री महेश ढवाण यांनी सोबत असलेल्या स्टाफला सुचना देवुन आजु बाजुच्या परीसरातील तसेच मयत राहात असलेल्या इमारतीमधील सीसीटीव्ही फुटेज चेक करण्याच्या सुचना दिल्या. पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मयताचा खुन हा आरोपी संतोष गुळगुळे याने केल्याचे निष्पन्न केले. आरोपी हा हिंगोली जिल्हयातील राहणारा असल्याने व आरोपीचा तपासकामी शोध घेणे आवश्यक असल्याने मा पोलीस निरीक्षक श्री महेश ढवाण सो यांनी कोणत्याही क्षणाचा विलंब न करता तात्काळ आरोपीचा शोध घेणे कामी तिन पथके तयार केली. त्यामध्ये पथक क्रमांक १ मधील सपोनि योगेश लंगटे पो हवा रमेश भेसले, सुरेश साळवे, पो काँ शशिकांत दळवी हे अधिकारी व कर्मचारी बारामती बस स्टॅण्ड येथे पथक क्रमांक २ मधील पो हवा राम कानगुडे पो ना अमोल नरूटे पो कॉ दत्तात्रय मदने हे कर्मचारी बारामती रेल्वे स्टेशन, कटफळ रेल्वे स्टेशन येथे पथक क्रमांक ३ मधील मसपोनि आश्विनी शेंडगे पो हवा राजु जाधव, पो ना राजेंद्र काळे हे अधिकारी व कर्मचारी भिगवण रेल्वे स्टेशन व दौड रेल्वे स्टेशन येथे रवाना केले. पथक क्रमांक २ चे कर्मचारी हे आरोपीचा शेध घेणे कामी कटफळ रेल्वे स्टेशन येथे गेले असता आरोपीला तेथे पोलीस आल्याची चाहुल लागताच तो तेथुन पळु लागला पोलीसांनी त्याला पळताना पाहुन पोलीसही त्याचे मागे पळु लागले पोलीसांनी मोठ्या शिताफीने पाठलाग करून आरोपी नामे संतोष गुळगुळे यास ताब्यात घेतले आरोपी हा मोबाईल वापरत नसल्याने आरोपीचा शेध घेणे अवघड असुन सुध्दा बारामती तालुका पो स्टे अधिकारी व कर्मचारी यांनी आरोपीस गुन्हयाची माहिती मिळताच दोन तासातच पकडुन गुन्हयातील आरोपी निष्पन्न केल्याने बारामती परीसरातील नागरीक पोलीसांवर कौतुकाचा वर्षाव करीत आहेत

सदरची कामगिरी मा. श्री अभिनव देशमुख सो पोलीस अधिक्षक पुणे ग्रामिण, मा.श्री मिलींद मोहीते सो अपर पोलीस अधिक्षक बारामती, मा. श्री गणेश इंगळे उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग बारामती यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश ढवाणे, सपोनि योगेश लंगुटे, मसपोनि आश्विनी शेंडगे, पोसई, दत्तात्रय लेंडवे, सहा फौज मंत्रे, अविनाश गायकवाड, कल्याण शिंगाडे, पो हवा राम कानगुडे, रमेश भोसले, सुरेश साळवे, सुरेश दडस, राजेंद्र जाधव, पोलीस नाईक अमोल नरूटे, राजेंद्र काळे, पो कॉ दत्तात्रय मदने, शशिकांत दळवी, दौंड रेल्वे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोहवा वाघमारे, घुले, दौंड पोलीस स्टेशन येथील पोहवा शिंदे यांनी केली.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )