मळद येथे शेती शाळेचे आयोजन

प्रतिनिधी- मौजे मळद येथे दिनांक ६/१०/२०२१ रोजी विज्ञान केंद्र शारदानगर, महाराष्ट्र शासन कृषी विभाग -बारामती, व एकता शेतकरी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता भारत अभियान व सोयाबीन पिकाची क्रॉपसॅप योजनेअंतर्गत अंतर्गत विनाअनुदान सोयाबीन शेतीशाळा वर्ग 10 व शेतीदिन कार्यक्रम आयोजन करण्यात आले होता. सदर कार्यक्रमाच्या वेळी kvk शारदानगर येथील श्री. डॉ रतन जाधव यांनी स्वच्छतेचे महत्व व आरोग्य विषयी घ्यावयाची काळजी व पोषक मूल्य आहार या विषयी माहिती दिली. तसेच संतोष गोडसे यांनी रब्बी हंगामातील योजना, प्रात्यक्षिके, तसेच महिला आरोग्य तपासणी , परसबाग , सोयाबीन काढणीपश्‍चात तंत्रज्ञान, साठवणूक व प्रक्रिया इ. माहिती दिली. मनीषा काजळे कृषी सहाय्यक यांनी कृषी विषयक योजनां व पिक विमा योजने ची माहिती दिली. मान्यवरांचे स्वागत सरपंच श्री योगेश बनसोडे व उपसरपंच श्री किरण गावडे यांनी केले. सूत्रसंचालन एकता शेतकरी ग्रुप चे अध्यक्ष श्री प्रशांत शेंडे यांनी केले. यावेळी मान्यवरांनी उपस्थितांना परसबागेचे देशी भाजीपाल्याचे बियाण्याचे वाटप तसेच सिताफळाच्या रोपांचे वाटप केले. कार्यक्रमानंतर या परिसरातील स्वच्छता करण्यात आली, कार्यक्रमाला ग्रामसेवक श्री. सुनील पवार ,बँक ऑफ बडोदा मॅनेजर श्री माळी, वाघेश्वरी सोसायटीचे सचिव श्री. शिंदे, ग्रामपंचायत सदस्य सौ. पिसाळ तसेच ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )