बारामती तालुका पोलीस स्टेशन येथील जबरी चोरीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेकडून उघड करून आरोपी जेरबंद…

बारामती तालुका पोलीस स्टेशन येथील जबरी चोरीचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेकडून उघड करून आरोपी जेरबंद…

प्रतिनिधी – बारामती तालुका पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 368/2023 IPC 392,34 यातील फिर्यादी फिर्यादी हे त्यांच्या घरी मोटरसायकलवर जात असताना उंडवडी कप गावचे अलीकडे अज्ञात तीन आरोपींनी मोटरसायकलवर घेऊन फिर्यादी यांना अडवून आरोप कडील दहा हजार रुपये किमतीचा रेडमी कंपनीचा मोबाईल जबरीने हिसकावून घेऊन मोटरसायकलवर निघून गेले होते .सदर आरोपी बाबत वरील प्रमाणे गुन्हा दाखल होता.गोपनीय बातमीदाराने दिलेल्या माहितीवरून इसम नामे अजय सुदाम पवार वय वर्ष 22 राहणार आदर्श नगर माळेगाव तालुका बारामती जिल्हा पुणे या ताब्यात घेऊन त्याच्याकडून गुणात गेलेला मुद्देमाला हस्तगत करून तसेच पुण्यात वापरलेले मोटरसायकल आरपी कडून जप्त करण्यात आली आहे.

आरोपीची वैद्यकीय तपासणी करून सदर आरोपी बारामती तालुका पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई ही मा पोलिस अधिक्षक श्री. अंकित गोयल सो अप्पर पोलिस अधिक्षक सो आनंद भोईटे, एस.डी.पी.ओ बारामती श्री गणेश इंगळे यांचे मार्गदर्शन खाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, PSI सिदपाटील, ASI कोकरे
ASI कारंडे, पो हवा स्वप्निल अहिवले, पो.हवा अभिजीत एकशिंगे, पो हवा राजू मोमीन, पोलीस हवालदार अतुल डेरे, पो हवा अजय घुले, पो हवा निलेश शिंदे यांनी केली आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus (0 )