प्रजासत्ताक दिनानिमित्त मेखळी येथे लहान मुलांचे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न…

प्रजासत्ताक दिनानिमित्त मेखळी येथे लहान मुलांचे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न…

प्रतिनिधी – दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी नटराज नाट्यकला मंडळ आयोजित किरण गुजर जेष्ट नगरसेवक बारामती यांच्या विशेष सहकार्य ने विश्ववती आयुर्वेदिक हॉस्पिटल व संशोधन केंद्र कोल्हापूर यांच्या विद्यमाने मेखळी जिल्हापरिषद शाळा बरकडवाडी येथील विद्यार्थी यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्या मध्ये मुलांच्या वयानुसार वाढ किती आहे या अनुसरून उपचार केले व मुलांना आयुर्वेदिक बिस्कीट देण्यात आले याचे उदघाटन, शिवसेना युवासेना तालुका प्रमुख अमोल देवकाते यांनी केले. या वेळी मा उपसरपंच महादेव माने, शाळा समिती सदस्य ब्रह्मदेव देवकाते, इंद्रजित डोंबाळे, सूर्याजी देवकाते, गणेश काळे, तेजस देवकाते व सर्व पालक उपस्थित होते. सदरचा कार्यक्रम ऋषि देवकाते यांच्या माध्यमातून घेण्यात आला होता.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )