दौंड येथे कृषि अन्नप्रक्रिया कार्यशाळा संपन्न.

दौंड येथे कृषि अन्नप्रक्रिया कार्यशाळा संपन्न.

प्रतिनिधी – तालुका कृषी अधिकारी कार्यालय दौंड यांच्यावतीने केंद्र शासन सहाय्यित प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन (PMFME) योजनेच्या कृषि प्रक्रिया जागृती पंधरवडा कार्यशाळेचे आयोजन नवीन प्रशासकीय इमारत दौंड येथे करण्यात आले होते. बारामतीचे उपविभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेगावाचे हळद प्रक्रिया उद्योजक सुधीर पवार हे होते . तालुका कृषी अधिकारी राहुल माने, कृषी अधिकारी राणी खर्डे , आत्माचे तंत्रज्ञान व्यवस्थापक महेश रुपनवर, संसाधन व्यक्ती दिलावर शेख, स्टेट बँक ऑफ इंडिया , उरुळी कांचन शाखेच्या व्यवस्थापक शीतल जाधव, तसेच राष्ट्रीयकृत व खासगी बँकांचे प्रतिनिधी वैयक्तिक शेतकरी शेतकरी गटाचे सदस्य शेतकरी मित्र हे उपस्थित होते.
या कार्यक्रमामध्ये कृषीशी निगडित अन्न प्रक्रिया उद्योग स्थापीत आहेत व ज्यांना नवीन उद्योग चालु करवयाचे आहे अशा उद्योगांच्या वाढीसाठी सदरची योजना केंद्र व राज्य सरकारने पुरस्कृत केली आहे या योजनेमध्ये शेतकऱ्यांना कर्जाशी निगडित अनुदान देण्यात येणार आहे ते अनुदान 35% किंवा दहा लाख यापैकी जे कमी असेल तेवढे अनुदान देण्यात येईल यांनी शेतकरी गट शेतकरी उत्पादक कंपन्या यांनी योजनेमध्ये कशाप्रकारे सहभागी व्हावे याबाबत विस्तृत मार्गदर्शन तालुका कृषी अधिकारी राहुल माने यांनी केले, आत्माचे तंत्रज्ञान व्यवस्थापक महेश रुपनवर यांनी शेतकऱ्यांनी प्रक्रिया उद्योगांमध्ये उतरून स्वतःचा ब्रँड तयार करू विक्री करण्याबाबत आव्हान केले. संसाधन व्यक्ती दिलावर शेख यांनी योजेनेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. राष्ट्रीयीकृत व खाजगी बँकांचे प्रतिनिधी म्हणून स्टेट बँक ऑफ इंडिया , उरुळी कांचन शाखेच्या व्यवस्थापक शीतल जाधव यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रम प्रसंगी मंजुर झालेल्या उद्योजकामधून अमित लडकत, सुरज मांढरे, पारगावच्या सरपंच जयश्री ताकवणे, जेधे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या योजनेमध्ये तालुक्यामध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल कृषी सहाय्यक अभिजित लोणकर व कृषी सहाय्यक अंबादास झगडे यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यशाळेसाठी तालुक्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांचे अध्यक्ष, सचिव, स्वयंसहायता बचत गटाचे प्रतिनिधी, युवा उद्योजक, विविध ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य,पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी सहाय्यक प्रकाश लोणकर, यांनी केले तर आभार महेश रुपनवर यांनी मानले.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )