कुरवली गावात ग्लोबल शेपर्स कम्युनिटी बारामती हब च्या माध्यमातुन मासिकं पाळीवर विषयक कार्यशाळा व जनजागृती उपक्रम यशस्वी संपन्न

कुरवली गावात ग्लोबल शेपर्स कम्युनिटी बारामती हब च्या माध्यमातुन मासिकं पाळीवर विषयक कार्यशाळा व जनजागृती उपक्रम यशस्वी संपन्न

प्रतिनिधी – भारत स्वतंत्र होऊन ७७ वर्ष झाली विज्ञानाने खुप प्रगती केली पण या विज्ञानाला माणसाच्या मानसिकतेला बदलता आल नाही कारण पण तसच आहे.आपल्या चाली रिती, परंपरा याला कारणीभूत आहेत सुमारे ७० टक्के किशोरवयीन शाळकरी मुलीं मासिक पाळीच्या दरम्यान शाळेत गैरहजर असतात, अशी धक्कादायक बाब पुढे आली आहे. युनिसेफने महाराष्ट्रात केलेल्या एका पाहणीनुसार 11 ते 19 वयोगटातील केवळ 13 टक्के मुलींना पहिली पाळी येण्याअगोदर पाळीबाबत माहिती होती. या अहवालानेच शासनाची झोप उडविली आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थिनींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन प्रशिक्षण सुरू करणं खर म्हणल तर शासनाची जबाबदारी आहे पण यात काही सेवाभावी संस्था पण पुढे येत आहेत शालेय जीवनात अशा संवेदनशील विषयावर मार्गदर्शन होन नितांत गरजेचं आहे. गेली २वर्ष झाली ग्लोबल शेपर्स कम्युनिटी बारामती हब बारामती व इंदापूर तालुक्यात अत्यंत प्रामाणिक पणे काम करत आहे. ४०००पेक्षा जास्त शालेय मुलीना मार्गदर्शन व सॅनिटरी नॅपकिन्सच वाटप बारामती हब च्या माध्यमातुन करण्यात आल आहे.म्हणूनच ग्लोबल शेपर्स कम्युनिटी बारामती हब च्या माध्यमातून कुरवली गावात श्री शंकरराव पाटील माध्यमिक विद्यालयात किशोवयीन मुलींची कार्यशाळा घेण्यात आली या कार्यशाळेत सुमारे २६० विद्यार्थिनीनी सहभाग नोंदवलं. त्याच प्रमाणे २६० मुलीनं सॅनिटरी नॅपकिन्स च वाटप करण्यात आल .मासिक पाळी विषयी जनजागृती होन आवश्यक आहे कारण अनेक परंपरा, चाली रिती यामुळे या विषयी बोलणं टाळलं जातं याचा परिणाम आरोग्यावर होण्याची शक्यता असते म्हणून जनजागृती होण गरजेचं असत. विशेष म्हणजे या उपक्रमात मा.ज्योस्थना उत्तमचंदाणी (मॅनेजिंग डायरेक्टर सिस्का ग्रुप)यांचा मोलाच सहकार्य लाभलं त्यांचं मार्गदर्शन शालेय मुलीनं साठी मोलाचं ठरलं. त्याच प्रमाणे राष्ट्रपती पुरसकार विजेत्या मा. श्रीमती मनीषा भाऊसाहेब जाधव व शारदाबाई पवार नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केल त्याच प्रमाणे गावचे सरपंच मा. राहुल चव्हाण, विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. घोरपडे सर तसेच महाविद्यालयाचे सर्व शिक्षकवृंद, गावच्या ग्रामपंचायतचे उपसरंच सौ.मंदा चव्हाण ग्रा.स पूजा खोमणे ,पुष्पा माने ,डॉ.शुभांगी मारकड आशा सेविका प्रतिभा माने ,शालन पांढरे, स्वाती भोपळेव तसेच पुणे जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी मा.पुष्कराज निंबाळकर या सर्वांचं मोलाचं सहकार्य केले त्याच प्रमाणे हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी हबच्या सर्व सदस्यांनी खुप मेहनत घेतली मा. देवयानी पवार यांच्या मार्गर्शनाखाली तसेच शुभम ओसवाल व फातिमा खायमखनी यांच्या आर्थिक सहाय्य व शंतनु जगताप, भरवी मुलमुले, माऊली खाडे, अखिल सूर्यवंशी, ओमकार कोकरे,ऋषिकेश नलावडे, हतीम आत्तरवला, खादिजा खायमखणी या सर्वांच्या मेहनतीने हा उपक्रम यशस्वी झाला.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus (0 )