राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियाना अंतर्गत ज्वारी बियाणे वाटप

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियाना अंतर्गत ज्वारी बियाणे वाटप

प्रतिनिधी :- राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान सण २०२१-२२ अंतर्गत मौजे तरडोली व मोरगाव येथील शेतकरी गटांना कृषी विभागा मार्फत रब्बी ज्वारी वाण-फुले रेवती चे बियाणे वाटप करण्यात आहे आहे. दोन्ही गावांमध्ये रब्बी ज्वारी चा प्रकल्प राबिवला जाणार आहे. या प्रकल्पा मध्ये बियाणे पेरणी पेरणी यंत्रा मार्फत केली जाणार आहे. प्रकल्पा अंतर्गत एकरी प्रत्येक शेतकऱ्यास ४ किलो बियाणे देण्यात आले आहे. तरडोली मधील शिवतेज शेतकरी गट, कऱ्हामाई शेतकरी गट व मोरगाव मधील मोरया शेतकरी गट, विघ्नहर्ता शेतकरी गट मार्फत रब्बी ज्वारी प्रकल्प राबिवला जाणार आहे. प्रत्येक गाव मध्ये १० हेक्टर क्षेत्र व २५ शेतकऱ्यानंसाठी हा प्रकल्प आहे. बीज प्रक्रिया करून व पेरणी यंत्रा द्वारे पेरणी करण्याच्या सूचना तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल यांनी दिल्या आहेत.कृषी पर्यवेक्षक विजय चांदगुडे व कृषी सेवक प्रसाद तावरे यांच्या उपस्थितीत बियाणे वाटप करण्यात आले. शेतकरी गटातील गंगाराम तावरे, चंद्रकांत भापकर, गजानन भापकर, विकास साळवे इ. शेतकरी या वेळी उपस्थित होते.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )