दौंड मधील मळद येथे कृषि विभागाच्या वतीने बाजरी प्रकल्पाच्या निविष्ठा वाटप…

दौंड मधील मळद येथे कृषि विभागाच्या वतीने बाजरी प्रकल्पाच्या निविष्ठा वाटप…

प्रतिनिधी – दौंड तालुक्यातील मळद येथे खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर बाजरीचे पीक घेतले जाते यात प्रामुख्याने भगतवस्ती, मोरेवस्ती, सय्यदनगर या भागातील शेतकरी बाजरी उत्पादनात अग्रेसर आहेत. सध्या कृषि विभागातर्फे दौंड तालुक्यात शेतकऱ्यांसाठी तालुका कृषि अधिकारी राहुल माने यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे यामध्ये पौष्टीक तृणधान्य विकास कार्यक्रमांतर्गत बाजरी पिकाच्या उत्पादन वाढीच्या दृष्टीने बाजरी प्रकल्पासाठी निवड झालेल्या शेतकऱ्यांना सरपंच सौ. रेश्माताई घागरे यांच्या हस्ते निविष्ठा वाटप करण्यात आल्या. यावेळी शेतकऱ्यांना कृषी सहाय्यक मळद अझरुद्दीन सय्यद यांनी बाजरी बियाणे बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखवले तसेच बाजरी पिकात असणारे लोहाचे प्रमाण व त्यामुळे रक्त वाढीस होणारा त्याचा फायदा याचे महत्व सांगितले. या कार्यक्रमासाठी मंडळ कृषी अधिकारी पाटस महेंद्र जगताप यांनी शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजना व महाडीबीटी योजनेविषयी सविस्तर माहिती दिली तसेच कीड व रोग नियंत्रणासाठी निमार्क व ट्रायकोडर्माचे महत्त्व सांगून त्याचा वापर कसा करावा याची माहिती दिली. यावेळी कृषी पर्यवेक्षक संजय कदम यांनी एकरी 100 टन ऊस उत्पादन घेण्यासाठी आडसाली ऊस लागवडीचे आधुनिक तंत्रज्ञान या विषयी मार्गदर्शन केले या वेळी परिसरातील शेतकरी राहुल शेलार, हरिदास घागरे, कुलदीप भगत, आरिफ सय्यद,बाळासाहेब भगत, स्वप्नील भगत, जयसिंग मोरे, दिनकर भगत, संपत भगत, हुसेन सय्यद व परिसरातील युवा वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )