जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षिका या पुरस्काराने अनुराधा जगताप-काळे सन्मानित…

जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षिका या पुरस्काराने अनुराधा जगताप-काळे सन्मानित…

प्रतिनिधी – दौंड तालुक्यातील गोपाळवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील आदर्श शिक्षिका अनुराधा संतोष जगताप (काळे ) यांना पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने आदर्श शिक्षिका या पुरस्काराने पुणे येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंञी श्री. अजित पवार व पालकमंञी श्री. चंद्रकांत पाटील यांच्या वतीने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रमेश चव्हाण, पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीम. संध्या गायकवाड, सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. जगताप मॅडम यांचे दौंड पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी मा. महाजन, दौंड बीट चे विस्तार अधिकारी दिघे, गोपाळवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री होले तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोपाळवाडी येथील मुख्याध्यापक, शिक्षक वृंद , विद्यार्थी व शाळा व्यवस्थापन समिती च्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहेत.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )