दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना प्रशासनातर्फे अभिवादन : पत्रकार दिन साजरा

दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना प्रशासनातर्फे अभिवादन : पत्रकार दिन साजरा

बारामती दि.6: मराठीतील पहिल्या ‘दर्पण’ या वृत्तपत्राच्या आरंभ दिनानिमित्त प्रशासनातर्फे प्रशासकीय भवनातील उप माहिती कार्यालयात ‘पत्रकार दिन’तसेच ‘दर्पणदिन’ साजरा करण्यात आला. प्रारंभी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी श्री. कांबळे यांनी उपस्थित सर्वांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास नायब तहसिलदार डॅा.भक्ती सरवदे- देवकाते यांच्यासह योगेश नालंदे, तानाजी पाथरकर, संदीप साबळे, राजेश वाघ, चेतन शिंदे, अभिजित कांबळे, राजू कांबळे, संतोष जाधव, स्वप्निल कांबळे, संतोष शिंदे, विलास कोकरे, शुभम अहिवळे, दशरथ मांढरे, निलेश जाधव तसेच उपविभागीय अधिकारी व उपमाहिती कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )