तुषार जगताप यांची भारतीय युवा शक्ती ट्रस्ट च्या मेंटॉर पॅनलवर निवड..

ग्लोबल टेक्नॉलॉजी स्किल डेव्हलपमेंट चॅरिटेबल ट्रस्ट व भारतीय युवा शक्ती ट्रस्ट पुणे यांच्यामधे सामाजंस्य करार संपन्न.

प्रतिनिधी :- दि- 14/09/2021 रोजी श्री तुषार जगताप यांची भारतीय युवा शक्ती ट्रस्ट या संस्थेत बिझनेस गुरू (मेंटाॅर) म्हणून निवड करण्यात आली असून, त्या निवडीचे पत्र त्यांना देण्यात आले. तसेच भारतीय युवा शक्ती ट्रस्ट हडपसर,पुणे ही संस्था “उद्योजक घडवण्याचे कार्य करते तसेच नवीन होतकरू तरूण-तरुणींना स्वतःचा व्यवसाय उभारण्यात सर्व मदत निशुल्क करत असते. त्याचबरोबर ग्लोबल टेक्नॉलॉजी स्किल डेव्हलपमेंट चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेचे अध्यक्ष श्री .तुषार जगताप हे तरुणांनी उद्योजक व्हावे म्हणून संस्थेच्या माध्यमातून काम करत असतात. त्यांच्या या कामाची दखल घेऊन भारतीय युवा शक्ती ट्रस्ट या संस्थेने त्याच्यां संस्थेबरोबर सामाजंस्य करार केला आहे. व सामाजंस्य कराराची एकमेकांबरोबर देणाव- घेवाण करण्यात आली. सदर कार्यक्रम भारतीय युवा शक्ती ट्रस्ट या संस्थेच्या हडपसर येथील कार्यालयात पार पडला.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )