तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागात सिडबॉल कार्यशाळा संपन्न

तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागात सिडबॉल कार्यशाळा संपन्न

प्रतिनिधी – पर्यावरण संवर्धन समितीच्या वतीने ‘सिडबॉल तयार करणे’या एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. ही कार्यशाळा महाविद्यालयाच्या कविवर्य मोरोपंत उद्यानामध्ये घेण्यात आली. या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश जगताप सर उपस्थित होते. तसेच उपप्राचार्य डॉ.अशोक काळंगे आणि रजिस्ट्रार श्री.अभिनंदन शहा उपस्थित होते. उपप्राचार्य प्रा.सौ वैशाली माळी, समन्वयक प्रा.श्री.संजय शेंडे, समन्वयक प्रा.श्री.गोरखनाथ मोरे उपस्थित होते. या कार्यशाळेत महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागातील डॉ.माधुरी पाटील यांनी विद्यार्थ्यांना सीडबॉल बनविण्याचे प्रशिक्षण देत मार्गदर्शन केले. महाविद्यालयाच्या कला शाखेतील एकूण 60 विद्यार्थी- विद्यार्थिनींनी या कार्यशाळेत सहभाग घेऊन एकूण 500 सिडबॉल तयार केले. कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी सूत्रसंचालन प्रा. सौ अनिता पवार यांनी केले. उपस्थितांचे स्वागत पर्यावरण संवर्धन समिती प्रमुख प्रा. श्री उदय कळंत्रे यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रा सौ मुग्धा टाकसाळे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.जवाहर शाह वाघोलीकर, सचिव श्री.मिलिंद शाह वाघोलीकर यांचे मार्गदर्शन लाभले.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )