ड्रोन कॅमेरा वापरत असाल तर सावधान

ड्रोन कॅमेरा वापरत असाल तर सावधान

प्रतिनिधी- संपूर्ण पुणे जिल्हा ग्रामीण भागात ड्रोन कॅमेरा द्वारे चित्रीकरण करण्यास मा.जिल्हाधिकारी सो पुणे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये पुणे ग्रामिण जिल्ह्यातील छायाचित्र करणारे व्यवसायिक,खाजगी व्यक्ती, इव्हेंट मॅनेजमेंट, संस्था यांना त्यांचे छायाचित्रणात ड्रोन कॅमेराचा वापर करावयाचा असल्यास त्याची पूर्व माहिती संबंधित पोलिस स्टेशन ला ७ दिवसांपूर्वी कळवून मा. जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे यांचे कडील रीतसर परवानगी घेणेबाबत त्यांचेकडील जा.क्र -पगक/कावि/८१३७/२०२१ दिनांक – २७/१२/२०२१ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केलेला आहे.
संपूर्ण पुणे ग्रामीण जिल्ह्यातील महत्त्वाची धार्मिक स्थळे,धरणे, केंद्रीय संस्था असून वरिष्ठ कार्यालयाकडून आलेल्या सूचना तसेच गोपनीय माहितीनुसार दहशतवादी कारवायांमध्ये ड्रोन कॅमेराद्वारे टेहाळणी होऊन त्याचा अतिरेकी कारवायांमध्ये उपयोग केला जाण्याची शक्यता असल्याबाबत कळविण्यात आलेले आहे या व्यतिरिक्त पुणे ग्रामीण जिल्ह्यात ठिकठिकाणी होणाऱ्या धार्मिक सोहळे, लग्नसमारंभ, राजकीय सभा किंवा इतर कार्यक्रम मध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांचा समावेश असतो अशा ठिकाणी ड्रोन कॅमेराद्वारे छायाचित्र होऊन त्याचा दुरुपयोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही याकरिता ड्रोन कॅमेरा चा छायाचित्रणाकरीता वापर करणाऱ्या संस्थांनी व आयोजकांनी त्याबाबतची पूर्व माहिती स्थानिक पोलिस स्टेशनला देणे आवश्यक आहे जेणेकरून त्याची वेळीच पडताळणी करून त्याबाबतची सत्यता पटवून कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेता येईल.
त्या अनुषंगाने वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन क्षेत्रांतर्गत कोणत्याही कार्यक्रम किंवा इतर प्रयोजनासाठी ड्रोन कॅमेराचा वापर करावयाचा असल्यास त्याची माहिती ७ दिवस अगोदर गोपनीय शाखा, वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन येथे देऊन पोलीस स्टेशन कडील ना-हरकत दाखला नागरिकांनी त्यांचे विनंती अर्जासोबत जोडून मा. जिल्हाधिकारी सो.कार्यालय पुणे यांचेकडून रीतसर परवानगी घ्यावी. अन्यथा विनापरवानगी ड्रोन कॅमेराचा वापर होत असलेबाबत माहिती मिळाल्यास किंवा निदर्शनास आलेस मा.जिल्हाधिकारी सो पुणे यांचे आदेशाचा अवमान केला म्हणून संबंधित सर्व साहित्य जप्त करून प्रचलित कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी सपोनि सोमनाथ लांडे यांनी दिलेली आहे.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )