टी. सी. महाविद्यालयामध्ये जागतिक महिला दिनानिमित्त यशस्वी साठ महिलांचा सत्कार

टी. सी. महाविद्यालयामध्ये जागतिक महिला दिनानिमित्त यशस्वी साठ महिलांचा सत्कार

बारामती : तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या साठ यशस्वी महिलांचा सत्कार करण्यात आला. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बुधवार दि.१५ मार्च रोजी महाविद्यालयातील जीवराज सभागृहामध्ये हा सोहळा पार पडला. राजकीय,वकील, डॉक्टर, इंजिनियर, पत्रकार,पोलीस, प्राध्यापक,कला, सामाजिक अश्या विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेल्या महिला, महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी तसेच सेविका यांनी हा सत्कार स्वीकारला. महाविद्यालयाचा हीरक महोत्सव व स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आजच्या स्त्रीने आत्मनिर्भरतेचा नवा अध्याय लिहिला असून विविध क्षेत्रात आपली उत्तुंग भरारी घेणा-या महिलांमधील स्त्रीशक्तीचा जागर आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आपल्या महाविद्यालयात होत असल्याचे गौरवोद्गार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.चंद्रशेखर मुरुमकर यांनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना काढले. ते पुढे म्हणाले की,स्त्री जेव्हा १००% यशस्वी होते असे आपण महणतो तेव्हा तिचे हे यश २००%असते.कारण स्त्री घर सांभाळून ही विशेष जबाबदारी पेलत असते. या महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी म्हणून महिला दिनानिमित्त हा सत्कार स्वीकारताना मला विशेष आनंद होत आहे असे मत बारामतीच्या माझी नगराध्यक्षा सौ पोर्णिमाताई तावरे यांनी व्यक्त केले. महिलांनी सामाजिक भान ठेऊन अडचणीत असलेल्या महिलांचे मनोधर्य वाढवण्याचे काम केले पाहिजे असे आव्हान विद्या प्रतिष्ठानच्या सचिव ऍडव्होकेट नीलिमाताई गुजर यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ.सीमा नाईक गोसावी मॅडम यांनी भूषवले. आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना त्या म्हणाल्या की,संस्था व महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवी वर्षात ६०च्या वर महिलांचा सन्मान होणे ही गोष्ट महाविद्यालयाच्या इतिहासातील अविस्मरणीय तर आहेच पण एक दस्तऐवज ठरावा अशी आहे.माजी विद्यार्थी हे एक संचित व ठेवा असतो. विद्यार्थ्यांचे महाविद्यालयांशी एक अतूट नाते असते.हा आपुलकी व जिव्हाळ्याचा धागा विद्यार्थी सातत्याने मनात जपतात. विद्यार्थ्यांना मिळालेला नवीन दृष्टिकोन ते समाजकार्यात वापरतात. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त स्त्री-पुरुष यांच्यातील विरोधी सूर बाजूला सारुन माणुसकीच्या साद- प्रतिसादातून  ते जपले जावे‌.तसेच प्रवाहाबाहेरील महिलांसाठी आपण सर्वांनी कार्य करावे.असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे रजिस्ट्रार अभिनंदन शहा यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ. विनायक लष्कर, प्रा.राजू पांडे आणि प्रा.संजय शेंडे यांनी केले. या कार्यक्रमाचे संयोजन प्राचार्य डॉ.चंद्रशेखर मुरूमकर यांचे मार्गदर्शनाखाली डॉ.सौ.सीमा नाईक-गोसावी व सुषमा संगई यांनी केले. कार्यक्रमाला बारामतीतील प्रतिष्टीत महिला, महाविद्यालयाचे प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष जवाहर शाह वाघोलीकर, संस्थेचे सचिव मिलींद शाह वाघोलीकर यांनी शुभेच्छा दिल्या.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )