झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने बारामती येथे साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

बारामती ( प्रतिनिधी, इंद्रभान लव्हे ) साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा 101 वा जयंती महोत्सव झोपडपट्टी सुरक्षा दल महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने बारामती या ठिकाणी राज्य संघटक तानाजी पाथरकर व पुणे जिल्हा संघटक आबासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बारामतीच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नामदेवराव शिंदे, पुणे जिल्हा सरचिटणीस युवक रविंद्र सोनवणे, संपादक पत्रकार सुरक्षा दलाचे अध्यक्ष योगेश नालंदे, संपादक संदिप साबळे, संजय वाघमारे, देवानंद मोरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अण्णाभाऊंच्या विचारांना उजाळा देण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दलित विकास आघाडी बारामतीचे सचिन सकट, बाबा सावंत, दत्तात्रय कांबळे इत्यादी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )