गट शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेतकरी उत्पादक कंपनी कडे वाटचाल करावी – मा. शरदचंद्रजी पवार.

<em>गट शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेतकरी उत्पादक कंपनी कडे वाटचाल करावी – मा. शरदचंद्रजी पवार.</em>


प्रतिनिधी – दि.30 मे रोजी रोजी जळगाव सुपे तालुका बारामती येथील बारामती ॲग्रोस्टार फार्मर प्रोड्यूसर कंपनी लि. च्या संचालक मंडळाने माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार यांची भेट घेतली, या भेटी दरम्यान बारामती तालुक्यातील जळगाव सुपे गावातील शेतकऱ्यांनी स्थापन केलेल्या केंद्र शासनाच्या FPO स्कीम अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी ची माहिती व पण कंपनीच्या माध्यमातून उत्पादित करीत असलेल्या खाद्यतेल (शेंगदाणा तेल, करडई तेल व सूर्यफूल तेल) या उत्पन्नाची माहिती दिली. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गट शेती करून उत्पादित मालावर प्रक्रिया उद्योग सुरू करावे व शेतीचे उत्पादन व उत्पन्न वाढ करावी असे मत साहेबांनी व्यक्त केले त्याप्रमाणे जळगाव सुपे व परिसरातील शेती विषयक तसेच जलसंधारण पायाभूत सुविधा शेतीच्या पाण्याचा प्रश्न भौगोलिक परिस्थितीनुसार पीक पद्धतीत बदल, शैक्षणिक सुविधा यासारख्या अनेक विषयांवर सविस्तर सखोल चर्चा झाली शेतकऱ्यांनी गट शेतीकडे वळावे व आपले उत्पन्न आपले शेतीचे उत्पादनात वाढ करावी ही काळाची गरज आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. पाणी फाउंडेशन अंतर्गत गट शेती स्पर्धेमध्ये कमी पाण्यावर अधिक उत्पादन देणारी पिके ( तूर मूग बाजरी मेथी कोथिंबीर सोयाबीन मका) घेण्यात येणार आहे अशी माहीती साहेबांना दीली. त्यावर शेतकऱ्यांनी गट शेती प्रयोग यशस्वी करावा त्याची पाहणी करण्यासाठी मी नक्कीच येईल अशी साहेबांनी इच्छा वक्त केली.
तसेच यावेळी बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांचीही भेट झाली ताईंनीही मोलाचे मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या. या भेटी प्रसंगी बारामती ऍग्रोस्टार फार्मर प्रोडूसर कंपनी चे चेअरमण सुनिल जगताप संचालक अनिल वाघ,आनंदराव खोमणे, संतोष जगताप, वैभव भापकर , स्वपनिल जगताप उपस्थित होते.

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )