खानाखजाना – तन्दूरी चिकन

खानाखजाना – तन्दूरी चिकन

भाग – १३ खानाखजाना या सदरामध्ये आपण पाहणार आहोत तंदूर चिकनची रेसिपीज ….

साहित्य – 1 कि. चिकन, 1 कापलेला कांदा, 2 लिंबांचे काप, 1 जुडी कोथंबीर, 2 मोठे चमचे कापलेला लसुण पेस्ट, 2 मोठे चमचे कापलेले अदरक, 225 ग्रा. दही, । मोठा चमचा मिठ, 2 चमचे मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला, ½ चमचा वाटलेली मेथी, 1 चमचा चाट
मसाला, 1 चमचा काळी मिरी वाटलेली, 4-6 थेंब खायचा रंग.

पद्धत – लसुण व अदरक पेस्ट बनवावी. लसुण, अदरक पेस्ट, दही मीठ, मिरची पावडर, गरम मसाला, वाटलेली मेथी, चाट मसाला, काळी मिरी आणि लाल रंगास एका ग्लासात टाकुन 8-10 मिनीटे फेटावे व एक सारखे करावे. चिकन चांगल्या तऱ्हेने फेटावे. मसाले टाकावे आणि मसालल्यास चिकनवर चांगल्या तऱ्हेने रगडावे. नंतर 4- 6 तासापासून रात्रभरासाठी चिकन मसाल्यात मुरवावे या वेळेत 4-6 वेळा चिकन उलट, पालट करावे, मेरीनेटेड चिकन तन्दूर मध्ये बेक करावे किंवा ओवन 220° सेल्सि, 425° सेल्सि. गॅस मार्कवर 7 वर सेट करावे. तारांच्या ट्रे वर ठेवून 10 मिनीट बेक करावे नंतर पलटवून 10 मिनीट बेक करावे, तुकडे करून किंवा मनपसंद अंदाजाने लिंबू व कोथंबीर टाकावी व गरम गरम खावे.

माहिती संकलन – वैष्णवी क्षीरसागर
(महिला प्रतिनिधी)

COMMENTS

Wordpress (0)
Disqus ( )